क्राइम

धक्कादायक: आजोबाची हत्या करून मृतदेह पुरला स्वतःच्याच घराच्या अंगणात

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

धक्कादायक: आजोबाची हत्या करून मृतदेह पुरला स्वतःच्याच घराच्या अंगणात

 कौटुंबिक वादातून नातवाने आजोबाची हत्या  केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील लाडबोरी येथे घडली आहे. सूरज सुधाकर सेलकर (24) असे हत्या करणाऱ्या नातवाचे नाव आहे. तर कवडू देटे असे हत्या झालेल्या आजोबाचे नाव आहे. सूरजने 5 जानेवारी रोजी आपल्या आजोबांची हत्या केली होती. त्यानंतर 45 दिवसांनी आरोपीची आई आणि मयताची मुलगी त्यांना भेटण्यासाठी आली असता सदर हत्येची घटना उघडकीस आली. याप्रकरणी मयताच्या मुलीने पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर संशयावरुन पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. यावेळी त्याने हत्येची कबुली दिली.


आरोपी हा मयत कवडू देटे यांच्या मुलीचा मुलगा असून तो आपल्या आजोबांकडे रहायला आला होता. यावेळी 5 जानेवारी रोजी आजोबा आणि नातवामध्ये काही कारणावरुन वाद झाला. या वादातून नातवाने कुऱ्हाडीच्या दांडक्याने आजोबांच्या डोक्यात वार केले. या मारहाणीत कवडू देटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. यानंतर सूरजने त्यांचा मृतदेह अंगणात पुरला.
सूरजची आई आणि मयत कवडू यांची मुलगी हत्येच्या 45 दिवसांनंतर आपल्या वडिलांना भेटण्यासाठी आली.

मात्र घरी आल्यानंतर तिला वडील कुठेच दिसले नाहीत. तसेच घरामध्ये काही ठिकाणी तिला रक्ताचे डाग दिसले. घरात एक वेगळीच दुर्गंधीही येत होती. तिने आपला मुलगा सूरजला आजोबा कुठे आहेत विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे मुलीला शंका लागली. तिने तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेत वडिल बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. याप्रकरणी पोलिसांनी प्रमुख

संशयित म्हणून सूरजला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता आरोपीने हत्येची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी अंगणात पुरलेला मृतदेह बाहेर काढून ताब्यात घेतला.

litsbros

Comment here