धक्कादायक! शिक्षीका पत्नीचा खून करून दोन मुलांना विहरीत टाकून डॉक्टर पतीची आत्महत्या

धक्कादायक! शिक्षीका पत्नीचा खून करून दोन मुलांना विहरीत टाकून डॉक्टर पतीची आत्महत्या

पुणे जिल्ह्यातील  दौंड मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका डॉक्टरने आपले अख्ख कुटूंबंच संपवले आहे. यामध्ये पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर दोन मुलांना विहीरीत टाकून त्यांची हत्या केली व स्वतः घरी जाऊन आत्महत्या केली. डॉक्टर यांची पत्नी शिक्षिका होती. या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.डॉ. अतुल शिवाजी दिवेकर (वय 42) पल्लवी अतुल दिवेकर (वय 39), अदिवत अतुल दिवेकर ( वय 9) वेदांती अतुल दिवेकर (वय 6) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.

डॉ. दिवेकर यांनी प्रथम पत्नीचा खून केला. त्यानंतर दोन मुलांना घेऊन ते घरापासून काही अंतरावर असलेल्या उसाच्या शेतातील विहिरीजवळ गेले. यानंतर आरोपीने मुलांना विहिरीत टाकून दिले. यानंतर  घरी येऊन आत्महत्या केली. डॉक्टर अतुल दिवेकर यांनी कौटुंबिक वादातून हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, हे कृत्य करण्यापुर्वी डॉ. दिवेकर यांनी चिठ्ठी लिहिल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पाटस व यवत पोलीसांनी धाव घेतली. दोन लहान मुले अद्याप सापडली नसून त्यांचा शोध सुरु आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
AddThis Website Tools
karmalamadhanews24:
whatsapp
line