मूलबाळ होत नाही म्हणून ढोंगी बाबाकडे जाणं भोवलं; भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार! वाचा सविस्तर

मूलबाळ होत नाही म्हणून ढोंगी बाबाकडे जाणं भोवलं; भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार! वाचा सविस्तर

मुलबाळ होत नाही म्हणून बाबाकडे आलेल्या महिलेला (वय २३) पूजा करण्याच्या बहाण्याने नदीकाठी नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा गंभीर आरोप दर्यापूर ठाण्यात दाखल तक्रारीत करण्यात आला.

संतोष गजानन बावणे (वय २८), असे संशयित कथित बाबाचे नाव आहे. दर्यापूर तालुक्यातील एका गावामध्ये हा प्रकार घडला. कथित बाबाने नदीकाठावर पूजा मांडत बाजूच्या झुडूपात अत्याचार केला. बुधवारी (ता. 7) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. पीडितेने दर्यापूर पोलिसात तक्रार देताच बाबा पसार झाला. मात्र दर्यापूर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. अंगात येत असल्याची बतावणी संशयित संतोष करीत होता.

अंगात येते व त्यातून लोकांच्या समस्या सोडवण्यास मदत होते, असा त्याचा प्रचार झाला होता. बुधवारी सकाळी एक जोडपे या बाबाच्या दर्शनासाठी आले. लग्न झाल्यानंतरही मुलबाळ होत नाही, अशी त्यांची तक्रार होती. त्यांनी कथित बाबाची भेट घेतली. महिलेला मूल होण्याकरिता पूजा मांडावी लागेल, असे संशयित बाबाने सांगितले. जोडपे लगेच पूजा करण्यासाठी तयार झाले. नदीकाठी ही पूजा करणार असल्याचे संशयित संतोष बाबाने सांगितले.

सायंकाळी पाचच्या सुमारास नदीकाठी पूजा करण्याकरिता हे जोडपे व बाबा, असे त्याठिकाणी गेले. नदीकाठी निर्जनस्थळी गेल्यानंतर पूजेचे साहित्य घरीच राहिले आहे, अशी बतावणी करून महिलेच्या पतीने ते साहित्य घेऊन यावे, असे बाबाने सांगितले. पीडितेचा पती जाताच त्या महिलेवर निर्जनस्थळी संशयिताने अत्याचार केला. पीडितेला धमकी दिली. मात्र महिलेने पतीला त्याबाबत माहिती दिली.

पतीने दर्यापूर पोलिसात तक्रार दिली. तोपर्यंत संशयित पसार झाला होता. पोलिसांनी रात्री या कथित बाबाला अटक करून अत्याचारासह विविध कलमांद्वारे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line