क्राइममहाराष्ट्र

पतीकडून पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून खून

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

पतीकडून विवाहितेचा चारित्र्याच्या संशयावरून खून

फकीरवाडी (ता. शिराळा) येथील २७ वर्षीय विवाहितेचा चारित्र्याच्या संशयावरून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत शिराळा पोलिस ठाण्यात भगवान श्रीपती पाटील (रा. शित्तुर तर्फ वारुण, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर) यांनी फीर्याद दाखल केली आहे.

याबाबत घटनास्थळावरून आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मृत सुवर्णा सुभाष पवार (वय २७ )वर्षे हिचा पती सुभाष सदाशिव पवार वय (३२), सासू बबुताई सदाशिव पवार, सासरे सदाशिव बाळू पवार आणि दीर दिंगबर सदाशिव पवार सर्व (रा. फकिरवाडी ता. शिराळा) यांनी चारित्र्याच्या संशयावरून धारधार शस्त्राने खून केला आहे. ही घटना शनिवारी (दि. ८) दुपारी साडेतीन वाजण्याच्या पूर्वी फकिरवाडी गावच्या हद्दीतील, अब्दुलकादीर महेबुबसाब पीरजादे यांचे मालकीच्या शेतात घडली. याबाबत भगवान श्रीपती पाटील यांनी फिर्याद दाखल केली आहे.

litsbros

Comment here