धक्कादायक: पोटच्या मुलीचा गळा आवळून खून, शेतात नेऊन जाळले, अस्थी टाकल्या नदीत
नांदेड शहरापासून जवळच असलेल्या पिंपरी महिपाल येथील शुभांगी जोगदंड आणि अमोल कदम यांच्यात प्रेम संबध जुळले होते. दोघेही नांदेडच्या आयुर्वेदिक कॉलेजमध्ये बीएएमएसचे शिक्षण घेत होते. दरम्यानच्या काळात शुभांगीचे लग्न जमलं होते. मात्र, शुभांगी आणि अमोलच्या प्रेम संबंधाची बाब पुढे आल्याने हे लग्न मोडले. याचा राग मनात होता.
राग मनात धरुन समाजात आपली बदनामी होत असल्याने शुभांगीला २२ जानेवारीला वडील जनार्दन जोगदंड, भाऊ केशव जोगदंड, मामा गिरधारी जोगदंड, कृष्णा आणि गोविंद या चुलत भाऊ अशा पाच जणांनी शुभांगीचा गळा अवळून खुन केला. त्यानंतर तिचा मृतदेह पोत्यात भरुन शेतात नेऊन जाळला. तसेच राख, अस्थी जवळच्या नदीत सोडले.
शुभांगीच्या मैत्रिणींना काही तरी गडबड झाल्याचे लक्षात आल्याने मैत्रिणीने महिला आयोगाकडे तक्रार केली. तसेच गावच्या पोलिस पाटलांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर या तक्रारी वरुन ऑनर किलिंगची धक्कादायक घटना समोर आली.
Comment here