क्राइमपुणे

संतापजनक! मुल होत नसल्याने नवऱ्याने बायकोला नेलं भोंदूबाबाकडे अन्….

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

संतापजनक! मुल होत नसल्याने नवऱ्याने बायकोला नेलं भोंदूबाबाकडे अन्….

विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बायकोला बाळ होत नसल्याने पतीसह सासरच्या मंडळींनी तिला भोंदुबाबाकडे नेलं. तिथे तिच्यावर जादूटोणा करून अघोरी पूजा करण्यात आली. हा प्रकार २०१९ पासून सुरू होता. याप्रकरणी पीडित महिलेने सिंहगड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.  


पुण्यातील धायरी परिसरात ही संतापजक घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून सिंहगड पोलिसांनी पीडितेचा पती, सासू-सासरे आणि कुटुंबातील इतर सदस्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
जयेश पोकळे, श्रेयस पोकळे, ईशा पोकळे, कृष्णा पोकळे, प्रभावती पोकळे, दीपक जाधव आणि बबिता जाधव असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, आरोपी जयेश पोकळे याचे पीडित महिलेसोबत लग्न झाले होते.


लग्नानंतर पीडितेचा घरच्यांनी अनेकवेळा मानसिक छळ केला. त्यांनी पीडितेकडे पैशांची मागणी सुद्धा केली. याबरोबरच सासरच्या मंडळींकडून महिलेला लग्नामध्ये मिळालेले दागिने आणण्यासाठी छळ सुरू होता. आरोपींनी इतक्यावरच न थांबता घरात भरभराटी व्हावी यासाठी पीडितेला भोंदुबाबाकडे नेले.
महिलेला मुलगा व्हावा यासाठी पतीसह सासू-सासरे, दीर-जाऊ या सगळ्या जणांनी मिळून तिची अघोरी पूजा देखील केली. हे सर्व पीडित महिलेच्या पतीच्या संगतमताने सुरू होते. अखेर या सर्व प्रकाराला कंटाळून पीडितेने पोलिसांत  धाव घेतली. पीडितेच्या फिर्यादीवरून सिंहगड पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

litsbros

Comment here