क्राइमपुणेसोलापूर

पुणे-सोलापूर हायवेवर थरारक घटना! गोळीबार करुन भररस्त्यात कार अडवली अन्…

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

पुणे-सोलापूर हायवेवर थरारक घटना! गोळीबार करुन भररस्त्यात कार अडवली अन्…

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक पाटी येथे थरारक घटनेनं खळबळ उडाली आहे. भररस्त्यात गोळीबार करुन चोरट्यांनी एका कारला अडवून तब्बल ३ कोटी ६० लाखांची रोकड लंपास केली. ही धक्कादायक घटना  शुक्रवारी रात्री २.३० वाजताच्या सुमारास घडली. या गंभीर घटनेमुळं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. याप्रकरणी गुजरात येथील मेहेसना जिल्ह्यातील कहोडात राहणारे भावेशकुमार अमृत पटेल यांनी इंदापूर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.


वरकुटे पाटी गावातील हद्दीत पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चार अज्ञात चोरट्यांनी गोळीबार करत भररस्त्यात कार अडवली. त्यानंतर चोरट्यांनी कारमधील प्रवाशांना मारहाण केली. त्याच दरम्यान कारमध्ये लपून बसलेल्या दोन चोरट्यांनी कारमध्ये असलेली ३ कोटी ६० लाख रुपयांची रोख रक्कम, तीन मोबाईल फोन लंपास केले. याप्रकरणी इंदापूर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

litsbros

Comment here