क्राइम

धक्कादायक ! पत्नीबद्दल अपशब्द वापरला म्हणून तरुणाने गळा दाबून केली हत्या

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

धक्कादायक ! पत्नीबद्दल अपशब्द वापरला म्हणून तरुणाने गळा दाबून केली हत्या

अहमदनगर  येथे एक धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. पत्नीबद्दल अपशब्द वापरणाऱ्या तरुणाचा गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. चास शिवारात फलके फार्म हाऊसजवळ सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. राहुल मोरे असं हत्या झालेल्या तरुणांच नाव आहे. तर सुरज लक्ष्मण मोरे (२२), हनुमंत नरसू गायकवाड (२४) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल कनका मोरे (१९), सुरज लक्ष्मण मोरे (२२) आणि हनुमंत नरसू गायकवाड (२४) अहमदनगर- पुणे महामार्गावरील हॉटेलमध्ये सोमवारी रात्री जेवणासाठी गेले होते. सुरज मोरे यांच्या पत्नीबद्दल राहुल मोरे याने अपशब्द वापरले. त्यामुळे सुरजने हनुमंतच्या मदतीने रागाच्या भरात राहुलची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्यांनी राहूलचा मृतदेह शिवारात फलके फार्म हाऊसच्या मागे फेकून दिला.

मात्र, हनुमंत गायकवाड बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अहमदनगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात स्वत:हून हजर झाला. त्यानंतर घडलेला सर्व प्रकार त्याने पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांना घटनास्थळी जाऊन तपास सुरु केला. त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी त्यांच्या पथकाच्या मदतीने दुसरा आरोपी सुरज मोरे याला अटक केली.

litsbros

Comment here