क्राइमपंढरपूर

म्हणून पतीने ओतले पत्नीच्या अंगावर उकळते पाणी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

म्हणून पतीने ओतले पत्नीच्या अंगावर उकळते पाणी

 पत्नी माहेरी जात नसल्याच्या कारणाने पतीने दारूच्या नशेत पत्नीच्या चेहऱ्यावर उकळते पाणी ओतल्याची घटना पंढरपूर तालुक्यातील आवे येथे घडली आहे. याबाबत संतोष बनसोडे (रा. आवे, ता. पंढरपूर) यांच्याविरुद्ध करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


 संतोष बनसोडे (रा. आवे, ता. पंढरपूर) हे त्यांच्या पत्नी मनीषा (वय ३०, रा. आवे, ता. पंढरपूर) यांना मागील दोन महिन्यांपासून दारू पिवून शिवीगाळ, मारहाण करतात. तसेच तू या घरात रहायचे नाही, तू तुझ्या माहेरी माहळुग – अकलूजला जा असे वारंवार म्हणून मला त्रास देत आहेत. हे सर्व बोलण्यासाठी मनीषाच्या शेजारी राहणारे मनीषाचे दीर सत्वान धोंडीराम बनसोडे व त्याची पत्नी बायडाबाई सत्यवान बनसोडे हे सांगतात.

ते मनीषाच्या नवऱ्यास वारंवार तिच्याबाबत वाईट सांगून तू बायकोला घरातून बाहेर काढ असे सांगत असतात.
१८ जून २०२२ रोजी रात्री आठच्या सुमारास संतोष दारू पिवून आले. त्यांनी मनीषा यांना तू घर सोडून जा म्हणून शिवीगाळ केली. मनीषा झोपल्यानंतर १९ जून रोजी पहाटे दीडच्या सुमारास तिच्या चेहऱ्यावर संतोषने उकळते पाणी टाकले. त्यात मनीषाचा पूर्ण चेहरा भाजल्याने तिला सोलापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

litsbros

Comment here