लग्नात दिला नाही सोफासेट, म्हणून नव्या नवऱ्याने नवरीला विषच पाजलय थेट!
लग्नात सोफा सेट आणि टीव्ही दिला नाही म्हणून पत्नीला मारहाण केल्यानंतर ती माहेरी निघून गेली. त्यानंतर माहेराहून जबरदस्तीने तिला शेतात आणून पतीने विष पाजण्याचा प्रयत्न केला. ही घटना कंधार तालुक्यातील बाभूळगाव येथे घडली.
या प्रकरणात पीडितेच्या तक्रारीवरून माळाकोळी पोलिसांनी गुन्हा नोंदविला. धनश्री तिरुपती गीते असे पीडित विवाहितेचे नाव आहे. कंधार तालुक्यातील बाभूळगाव येथे पती तिरुपती रामदास गिते हा पत्नीला नेहमी त्रास देत होता. लग्नात तुझ्या वडिलांनी सोफा सेट आणि टीव्ही दिला नाही म्हणून मारहाण करण्यात येत होती. त्यामुळे त्रासाला कंटाळून धनश्री गीते या गावातीलच आपल्या माहेरी दहा दिवसांपूर्वी निघून गेल्या होत्या.
त्यानंतर आरोपी तिरुपती गीते हा दुचाकी घेऊन सासरी पोचला. या ठिकाणी सासरच्या मंडळींशी बोलणे झाल्यानंतर त्याने पत्नी धनश्री यांना दुचाकीवर बसवून बाभूळगाव शिवारातील शेतात आणले. या ठिकाणी धनश्री यांना खाली पाडून जबरदस्तीने त्यांच्या तोंडात विष टाकून खून करण्याचा प्रयत्न केला. पत्नीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला.
Comment here