क्राइमपुणेमाळशिरससोलापूर जिल्हा

गाडीत वाहन चालकाचा संशयास्पद मृतदेह आढळला

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

गाडीत वाहन चालकाचा संशयास्पद मृतदेह आढळला

पाटस (ता. दौंड) टोलनाक्याजवळ उभ्या असलेल्या मालवाहतूक करणाऱ्या गाडीत वाहन चालकाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला. या वाहन चालकाचे नाव अरुण मंचर धडके (वय ३६, रा. कोडाळ हंगरगा, ता. आंळद, जि. गुलबर्गा) असे आहे. ही घटना मंगळवारी २१ जून रोजी उघडकिस आली.

पाटस (ता.दौंड) टोलनाक्याजवळील गरम मसाला हाॅटेल समोर बऱ्याच वेळ मालवाहतूक गाडी (एमएच १४ जेएल ५८२१) उभी असल्याने टोल कर्मचारी याने चालकाला आवाज दिला. परंतु गाडीतून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने कर्मचाऱ्याने या वाहनात डोकावून चालकाला उठवण्याचा प्रयत्न केले. मात्र तो उठत नसल्याने त्याला हलवून बघितले. परंतु तरी काहीही झाले नाही. त्यामुळे टोल कर्मचाऱ्यांनी त्वरित या चालकाचा मोबाईल घेऊन त्या मोबाईलवरून ट्रान्सपोर्ट मॅनेजर बंदीनवाज मौल्ला अत्तार यांना संपर्क केला.

दरम्यान ट्रान्सपोर्ट मॅनेजर मौल्ला अत्तार याने कुरकुंभ येथे असणाऱ्या दुसरे चालक कल्याण तुकाराम वाघे यांना माहिती दिल्याने ते घटनास्थळी आले. टोल कर्मचाऱ्यांनी या चालकाला रुग्णवाहिकेतून यवत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. या घटनेची फिर्याद कल्याण तुकाराम वाघे (वय २९, रा. कृकंटयाहळी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) यांना दिली आहे. हा मृत्यू संशयास्पद असून घटनेचा तपास पोलिस हवालदार कदम करीत आहे.

litsbros

Comment here