क्राइमसोलापूर जिल्हा

जुगार अड्ड्यावर धाड, माजी आमदारासह 29 जणांना अटक, सोलापुरातील कारवाईनं खळबळ

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

जुगार अड्ड्यावर धाड, माजी आमदारासह 29 जणांना अटक, सोलापुरातील कारवाईनं खळबळ

सोलापूर : कर्नाटकातील इंडीचे माजी आमदार रविकांत पाटील यांच्यासह 29 जणांना जुगार प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे. सोलापुरातील होटगी रोडवरील क्लब 9 येथे जुगार सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला प्राप्त झाली होती. गुन्हे शाखेतर्फे हा हॉटेलवर धाड टाकली असता या ठिकाणी अवैधरित्या जुगार सुरू असल्याचे आढळून आले. लोकांना जुगार अड्डा स्वतः माजी आमदार रविकांत पाटील चालवत असल्याचा आरोप पोलिसांचा आहे. धाड टाकल्याच्या वेळी माजी आमदार रविकांत पाटील हे स्वतः हॉटेलच्या बाहेर कार्यकर्त्यासह बसलेले होते.

त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
मात्र हॉटेलमध्ये पोलीस गेल्यानंतर जवळपास 19 जण हे जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून रोख 2 लाख 24 हजार 540 रुपये, 4 लाख 19 हजारांचे मोबाईल, 13 हजारांचे जुगार साहित्य असे एकूण 6 लाख 57 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. सर्व 29 आरोपींना रात्री उशिरापर्यंत विजापूर नाका पोलीस ठाण्यात बसविण्यात आले होते.रात्री उशीरा सर्व आरोपींची जामिनावर मुक्तता करण्यात आली. माजी आमदार रविकांत पाटील यांना अटक झाल्याचे कळताच कर्नाटकातील त्यांच्या समर्थकांनी विजापूर नाका पोलीस ठण्यासमोर मोठी गर्दी केली होती.


पैशांऐवजी कॉइनचा वापर

यावेळी जुगारात पैशांऐवजी कॉइनचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले. पैसे देऊन कॉइन खरेदी करायचे. या कॉइनचा वापर करून जुगार खेळला जायचा. अगदी दहा रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंतचे कॉइन या जुगार अड्ड्यावर विकले जात होते. धाडी दरम्यान पोलिसांनी पाच हजार रुपयांचे कॉईन्स देखील जप्त केले आहेत.

जुगार खेळण्यासाठी आलेल्या या लोकांपैकी बहुतांश लोक हे कर्नाटकातील असल्याचं दिसत आहे. मोठ्या आलिशान गाड्यांमधून हे लोक सोलापुरात जुगार खेळण्यासाठी येत होते. पोलिसांची धाड पडल्याचे लक्षात येतात अड्यावरून पळून जाण्यात काही जण यशस्वी देखील झाले.

रविकांत पाटील हे कर्नाटकातील इंडीचे आमदार राहिले आहेत. 1994, 1999, 2004 अशा तीन टर्म सलग निवडून आले होते. विशेष म्हणजे रविकांत पाटील यांनी अपक्ष राहून या निवडणुका लढवल्या होत्या. रविकांत पाटील हे कायम कोणत्या ना कोणत्या विषयावरून नेहमीच चर्चेत राहतात.

काल रविकांत पाटील यांना अटक झाल्याचे कळताच त्यांच्या समर्थकांनी पोलीस स्थानकाबाहेर मोठी गर्दी केली होती. कर्नाटकातून देखील अनेक कार्यकर्ते हे सोलापुरात दाखल झाले होते. त्यामुळे सोलापूरच्या विजापूर नाका पोलीस ठण्यासमोरील तणावपूर्ण बनले होते. दरम्यान अटक केलेल्या सर्व आरोपींना पोलीस ठाण्यात बाहेर फरशीवरच बसवले होते. तर माजी आमदार रविकांत पाटील यांना मात्र चौकशी कक्षात बसविण्यात आले होते. पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केलीय.

litsbros

Comment here