क्राइम

फोन पे च्या माध्यमातून डॉक्टरांनाचं लाखो रुपयांचा चुना!

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

 फोन पे च्या माध्यमातून डॉक्टरांनाचं लाखो रुपयांचा चुना !

अकोल्यात स्त्री रोग तज्ञ यांना कुटुंब नियोजन करण्याच्या नावाखाली कथित सैनिकांने लाखोने गंडा घातल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यासंदर्भात रामदासपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवणाऱ्या या घटनेने यूपीआयच्या माध्यमातून व्यवहार करण्यावर डॉक्टरांनाही विचार करण्यास भाग पाडले आहे.


सायबर क्राईम करणाऱ्यांकडून वेगवेगळे फंडे आर्थिक फसवणूक करण्यासाठी वापरल्या जात आहे. ऑनलाइन व्यवहार करून लाखोंनी चुना लावण्याचे काम या टोळीकडून केल्या जात आहे. चक्क सैनिक असल्याची बतावणी करून फसवणूक केल्याचा प्रकार अकोल्यातील रामदासपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर समोर आला आहे. फसवणूक झालेले दुसरे तिसरे कोणी नसून उच्चशिक्षित दोन स्त्री रोग तज्ञ आहेत.


माझ्या पत्नीची कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करायची आहे. मात्र, माझी नियोजित रजा रद्द झाल्यामुळे मी अकोल्याला येऊ शकत नाही. तरी आपण या शस्त्रक्रियेसाठी लागणारी फीज प्लीज मला कळवा, मी ऑनलाईन ती रक्कम ऑनलाइन जमा करतो, असे कथित सैनिकाने फोनद्वारे अकोला येथील दुर्गा चौकातील स्त्री रोग तज्ञाला सांगितले. फोन पे वर एक रुपया पाठविण्याची विनंती केली. देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांची अडचण लक्षात घेऊन संबंधित डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे फोन पे वर एक रुपया पाठविला.


त्यानंतर कदाचित सैनिकाने डॉक्टरांना फोन पे वरून तुम्हाला आलेल्या रमी टाउन नोटिफिकेशनला क्लिक करा, असे सांगून सुरुवातीला 10 हजार नंतर 15 हजार पुन्हा दहा हजार आणि पुन्हा पंधरा हजार असे करत त्याने आणखीन 10 हजार आणि तीस हजार आणि शेवटी 19 हजार 999 रुपये असे नोटिफिकेशन क्लिक करण्यास सांगितले. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार तसे केल्यानंतर डॉक्टरच्या बँक खात्यातून एक लाख दहा हजार रुपये कमी झाले. त्या मोबदल्यात कथित सैनिकाने डॉक्टरला एक रुपया परत केला, हे विशेष. हा प्रकार लक्षात येईपर्यंत कथित सैनिकाचा मोबाईल नॉटरिचेबल झाला.


तर, असाच प्रकार शहरातील आणखीन एक स्त्री रोग तज्ञासोबत झाला. त्यांना कथित सैनिकाने हजारो रुपयांनी गंडा घातला. याप्रकरणी डॉ. राहुल तुळशीराम लाखे यांना 96 हजार आणि डॉ. अतुल राधेशाम मुंदडा यांना एक लाख दहा हजार रुपयाने त्या कथित सैनिकांने ऑनलाइनच्या माध्यमातून लुबाडले आहे.
याप्रकरणी रामदासपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सायबर पोलिसांच्या माध्यमातून रामदासपेठ पोलिस करीत आहे.

litsbros

Comment here