क्राइमबार्शीसोलापूर जिल्हा

‘…नाहीतर तुमच्या लहान मुलीला घेऊन जातो!’ अशी धमकी देत चोरट्यांनी लुटला सोन्याच्या दागिन्यांसह अडीच लाखांचा ऐवज

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

‘…नाहीतर तुमच्या लहान मुलीला घेऊन जातो!’ अशी धमकी देत चोरट्यांनी लुटला सोन्याच्या दागिन्यांसह अडीच लाखांचा ऐवज

बार्शी शहरातील कॅन्सर हॉस्पिटलजवळ  असणाऱ्या कथले विहार येथे राहणाऱ्या तलाठ्याच्या बंगल्याचा मुख्य दरवाजा तोडून चोरट्यांनी ‘तुमच्या लहान मुलीला घेऊन जातो’ अशी धमकी देत साडेचार तोळ्याचे दागिने, रोख 25 हजार रुपये असा अडीच लाखांचा ऐवज घेऊन पसार झाले. याबाबत बार्शी शहर पोलिसांत चार जणांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.


भूम येथे महसूल विभागात तलाठी म्हणून कार्यरत असलेल्या योगेश शंकर जगताप (वय 34) यांनी फिर्याद दाखल केली. फिर्यादीनुसार, ही घटना बुधवारी, 1 डिसेंबर रोजी पहाटे तीनच्या दरम्यान घडली. जगताप कुटुंबीय मंगळवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान गेटला कुलूप तसेच घराच्या दारे- खिडक्‍या बंद करून रात्री साडेनऊला झोपले होते. रात्री दीडच्या दरम्यान लहान मुलगी उठल्याने जागे झालो होतो, त्या वेळी काहीही झाले नव्हते.


पहाटे तीनच्या दरम्यान मुख्य दरवाजा तोडत असल्याचा आवाज येत असल्याचे जाणवले म्हणून हॉलमध्ये येताच चौघेजण दरवाजा तोडून आत आले. हाफ बरमुडा, अंडरवेअर, काळे जॅकेट, पंचवीस ते तीस वयोगटातील ते सर्वजण होते. एकाच्या हातात मोठा चाकू, दोन जणांकडे काठ्या तर एकाच्या हातात कटावणी होती. सोने काढा, पैसे काढा, असे म्हणत त्यांनी ‘तुमच्या लहान मुलीला घेऊन जातो’ अशी धमकी दिली.


बेडरूमचे कपाट उघडून सोन्याची चेन, ब्रेसलेट, दीड तोळ्याचे नेकलेस घेतले तर पत्नी पूनम हिच्या अंगावरील दीड तोळ्याचे गंठण, दोन ग्रॅमचे झुबे, आई सुरेखाच्या अंगावरील सात ग्रॅमची चेन, दीड ग्रॅमची कर्णफुले, पाच ग्रॅमच्या दोन अंगठ्या व रोख 25 हजार रुपये बळजबरीने घेतले. चोरट्यांनी जाताना किचनमध्ये जाऊन सफरचंद, बदाम, काजू, केळी याच्यावर ताव मारून शूज घेऊन निघून गेले, असेही फिर्यादीत म्हटले आहे.


दरम्यान, जिल्हा अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, पोलिस उपअधीक्षक प्रशांत हिरे, पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच ठसे तज्ज्ञ व श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार हे करीत आहेत.

litsbros

Comment here