क्राइममहाराष्ट्र

धक्कादायक: वडिलांची संपत्ती आपल्यालाच मिळावी म्हणून केला सख्ख्या भावाचा खून

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

धक्कादायक: वडिलांची संपत्ती आपल्यालाच मिळावी म्हणून केला सख्ख्या भावाचा खून

 मोठ्या भावाने मित्राच्या मदतीने लहान भावाचे अपहरण करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  वडिलांची संपूर्ण मालमत्ता आपल्यालाच मिळावी म्हणून हा खून करण्यात आला आहे. ही घटना लातूर तालुक्यातील तांदुळजा येथे घडली आहे.


विशाल हरिभाऊ गायकवाड असे खून करण्यात आलेल्या लहान भावाचे नाव असून  हरिभाऊ उद्धवराव गायकवाड यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.  मुरुड पोलीस दोन आरोपींना अटक केली आहे.  विपीन हरिभाऊ गायकवाड व विकास व्यंकट ढाणे असे आरोपींची नावे आहेत.
आरोपी विपीन गायकवाड यानेच आपला लहान भाऊ शेतात जातो म्हणून निघून गेल्याबाबतची  तक्रार ८ ऑक्टोबर रोजी मुरुड पोलीस ठाण्यात दिली होती.

पोलीसांनी तपास केला असता मोबाईल कॉल रेकॉर्ड काढले. त्यावरून संशय आल्याने पोलिसांनी फिर्यादी असलेल्या भावास ताब्यात घेतले.

मित्राच्या मदतीने दगडूचा खून करून त्याचे प्रेत अंबाजोगाई तालुक्यातील तटबोरगाव शिवारात मांजरा नदीपात्रात टाकून दिल्याची कबुली दिली.


पोलिसांनी तब्बल दोन दिवस नदीपात्रात शोध घेऊन मृतदेह बाहेर काढले. तांदुळजा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून युवकाचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

litsbros

Comment here