क्राइम

80 हजारांची लाच घेतांना PSI ला रंगेहाथ पकडले

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

80 हजारांची लाच घेतांना PSI ला रंगेहाथ पकडले…!

अटकपूर्वजा जमीन रोखण्यासाठी 80 हजारांची लाच घेतांना, बीडच्या अंभोरा पोलीस ठाण्यातील PSI ला रंगेहात पकडण्यात आले आहे. ही कारवाई बीड व औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल 26 जुलै रोजी सायंकाळी केली आहे. राहुल पांडुरंग लोखंडे असे लाचखोर पीएसआयचे नाव आहे. सध्या ते बीडच्या आष्टी तालुक्यात असणाऱ्या अंभोरा पोलीस ठाण्यात पीएसआय म्हणून कार्यरत आहेत.

पीएसआय लोखंडे यांनी एका तक्रादाराकडून, गुन्ह्यात मंजूर असलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रद्द न करण्यासाठी, तसेच गुन्ह्यातील वाहने जप्त न करण्यासाठी, एक लाख रुपये लाचेची मागणी केली होती.
त्यानंतर तडजोडी अंती 80 हजारांची लाच घेताना, बीड व औरंगाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राहुल लोखंडेला रंगेहाथ पकडले आहे.

या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या कारवाईने लाचखोर पोलीस अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

नर्सची आत्महत्या: सोलापूर महामार्गालगत लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार

litsbros

Comment here