करमाळयात लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 14 दुकानांवर कारवाई तर एक दुकान सील; वाचा सविस्तर
करमाळा (प्रतिनीधी): करमाळा नगर परिषद व पोलीस प्रशासन यांच्याकडून शहरात संयुक्त कारवाई
सोलापूर जिल्ह्यामध्ये कडक लॉकडाऊनचे निर्बंध लागू असतानाही नियम मोडणाऱ्या आस्थापना व नागरिकांवर करमाळा नगर परिषद व पोलीस प्रशासन यांनी संयुक्तिक दंडात्मक कारवाई दिनांक 18 मे 2021 रोजी केली.
मा. जिल्हाधिकारी साहेब सोलापूर यांच्या आदेशानुसार वाढता कोरोना संसर्ग परिस्थितीत कडक लॉकडाऊनच्या सूचना एक जून पर्यंत लागू करण्यात आले आहेत.
यामध्ये मेडिकल वगळता सर्व आस्थापना बंद करणे किराणा व भाजी फळे याकरिता सकाळी 7 ते 11 या कालावधीत होम डिलिव्हरी तसेच सकाळी सहा ते नऊ या कालावधीत घरपोच दूध विक्रीकरिता परवानगी आहे. नागरिकांना मेडिकल कारणा व्यतिरीक्त विनाकारण बाहेर पडण्यास निर्बंध आहेत तथापि अशा विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर करमाळा नगर परिषद व पोलीस प्रशासन यांनी कारवाईचे कठोर पाऊल उचलले आहे. यामध्ये मॉर्निंगवॉक व इवनिंग वॉकसाठी बाहेर पडणारे , संचार बंदीचा नियम मोडणे, मेडिकल
व्यतिरिक्त इतर अस्थापना खुल्या करणे, विनाकारण बाहेर फिरणे इत्यादी कारणाकरिता 14 दंडात्मक कारवाई करत एकूण रक्कम रुपये 13 हजार 950रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच जिन मैदान शॉपिंग सेंटर मधील गाळा क्रमांक 13 हे दुकान नियम मोडून खुले केल्याबद्दल सदरचा गाळा सील करण्यात आला आहे.
नगरपरिषद व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त कारवाईचे नागरिकांमध्ये वचक बसत असल्याचे दिसून येत आहे.
या कारवाईमध्ये मुख्याधिकारी वीणा पवार मॅडम , सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप सर, नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी, पोलीस स्टाफ उपस्थित होते. यावेळी मुख्याधिकारी वीणा पवार मॅडम करमाळा नगर परिषद यांच्याकडून नागरिकांनी घरीच राहावे, सुरक्षित राहावे ,सर्व नियमांचे पालन करावे व प्रशासनास सहकार्य करावे असे सुचित करण्यात आले.
Comment here