पोटच्या पोराची कुऱ्हाडीने हत्या, कटरने तुकडे करून बाप….

पोटच्या पोराची कुऱ्हाडीने हत्या, कटरने तुकडे करून बाप….

पोटच्या पोराची कुऱ्हाडीने हत्या केल्यानंतर मृतदेहाचे कटरने तुकडे केल्याचा खळबळजनक प्रकार मिरजमध्ये घडला आहे. मुलाची हत्या केल्यानंतर बाप पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला आणि त्याने खुनाची कबुली दिली. राजेंद्र यल्लाप्पा हंडिफोड या 50 वर्षांच्या व्यक्तीने त्याचच 30 वर्षांचा मुलगा रोहित राजेंद्र हंडिफोड याची हत्या केली.

आपणच मुलाची हत्या केल्याचं सांगण्यासाठी आलेला बाप पाहून पोलिसांचीही पळापळ सुरू झाली. हंडिफोड त्यांच्या मुलासह मिरजच्या गणेश तलाव लक्ष्मी मंदिर परिसरात राहत होते. राजेंद्र यांनी त्यांच्या मुलाची कुऱ्हाडीने हत्या केली, यानंतर त्यांनी मृतदेहाचे कटरने तुकडे केले.

सुभाष नगर शिंदे हॉलजवळच्या एका प्लॉटवर राजेंद्र यांनी रोहितची हत्या केली. यानंतर त्यांनी मृतदेहाचे तुकडे केले आणि पोत्यात भरले आणि काही तुकडे गणेश तलावात आणून टाकले. मिरज पोलिस निरीक्षक यांच्यासह पोलीस फौज फाटा सुभाष नगर शिंदे हॉल आणि गणेश तलाव परिसरात लगेच दाखल झाला.

रोहित दारू आणि जुगाराचा व्यसनाधीन होता. व्यसानासाठी रोहित कुटुंबाला त्रास देत असल्याने त्याचा बापाने कायमचा त्याचा काटा काढला. या घटनेनंतर बापाच्या चेहऱ्यावर मात्र कोणत्याही प्रकारचा पश्चातापाचा लवलेश जाणवत नव्हता. मुलाची हत्या केल्याचं सांगण्यासाठी बापाने थेट पोलीस स्टेशनच गाठलं.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
AddThis Website Tools
karmalamadhanews24:
whatsapp
line