धक्कादायक! चाकूचा धाक दाखवून तरुणांचा वस्तीगृहातील 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार

 धक्कादायक! चाकूचा धाक दाखवून तरुणांचा वस्तीगृहातील 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार

अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील एका वस्तीगृहात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर दोन तरुणांनी चाकूचा धाक दाखवून आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केला आहे. या प्रकरणात पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या दोन अल्पवयीन मुली जिल्ह्यातील एका महाविद्यालयातील वस्तीगृहात शिक्षणासाठी राहत आहेत. पीडित मुलींवर दोन तरुणांनी चाकूचा धाक दाखवून आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार केला. या प्रकरणी पीडित मुलींच्या आई-वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे या प्रकरणात पीडितेच्या मैत्रिणीनेच या दोन आरोपींची ओळख त्यांच्याशी करून दिली होती. या प्रकरणात तिच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
AddThis Website Tools
karmalamadhanews24:
whatsapp
line