उमरड नजीक चोरी..पोलीस पाटलांच्या “त्या” कॉलने धोका टळला; पंधराव्या मिनिटाला जेऊर पोलीस घटनास्थळी दाखल
उमरड(नंदकिशोर वलटे): उमरड नजीक गायकवाड वस्तीवर अजिनाथ गायकवाड यांच्या घरी रात्री सव्वा अकराच्या सुमारास चोरट्यानी चोरी केली.याची माहिती उमरडचे पोलीस पाटील अंकुश कोठावळे यांना दिली त्यांनी लगेच ग्रामसुरक्षा यंत्राने अंतर्गत सुरू असलेल्या फोन कॉल वर चोरीची माहिती व सतर्कतेचा संदेश दिला तो फोन परिसरातील नागरिकांना तसेच सर्व पोलीस स्टेशन वर जाताच जेऊर पोलीस ठाण्यातुन पंधरा मिनिटांत पोलीस गाडी घटना स्थळी हजर झाली. दरम्यान लोक घराबाहेर येऊ लागले गोंधळ सुरू झाला याची जणीव चोरट्यांना झाली व त्यांनी चोरलेल्या वस्तू, चपला, अंगातील कपडे फेकून देऊन आडमार्गाने पळ काढला.
उमरड आणि झरे या दोन गावांच्या मध्ये असणाऱ्यां गायकवाड वस्तीवरील अजिनाथ श्रीरंग गायकवाड यांच्या घरी रात्रीद। अकराच्या सुमारास वस्तीवर कोणी नाही याचा अंदाज घेऊन काही चोरट्यानी चोरीचा प्रयत्न केला रोकड व सोने याची शोधा- शोध केली मात्र त्यांना ते सापडले नाही मग त्यांनी घरांतील कपडे, टीव्ही इतर वस्तू घेऊन पोबारा केला.वस्तीवरील लोक गणपती विसर्जन करून येत नाहीत तो पर्यंत चोरी करण्याचा बेत फसला गेला. आणि ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या त्या फोन कॉलने धोका टळल्याचे नागरिक बोलत आहेत.
Comment here