भयंकर! अकरा वर्षांच्या मुलाचा 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, घटनेने परिसरात खळबळ
कोरोनामुळे शाळकरी मुलांचे ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. अशातच एक भयंकर घटना नांदेडमध्ये उघडकीस आली आहे. नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या अकरा वर्षांच्या मुलाने बलात्कार केल्याचा आरोप होत आहे आहे. अल्पवयीन मुलाच्या अत्याचाराला बळी पडलेली पीडिताही अल्पवयीनच आहे. दहा वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नकळत्या वयात हातात इंटरनेट आल्यामुळे हा भयावह प्रकार घडल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अल्पवयीन पीडितेच्या पालकांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या अकरा वर्षांने बलात्कार केल्याचा आरोप होत आहे आहे. या मुलाने शेजारच्या मुलीला घराच्या पाठीमागे नेऊन तिच्यावर अत्याचार केले. या प्रकरणी पालकांच्या तक्रारीवरुन लिंबगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नकळत्या वयात हातात आलेल्या इंटरनेटच्या सहज उपलब्धतेमुळे कोवळ्या बालमनावर दुष्परिणाम वाढल्याची भीती या घटनेमुळे व्यक्त होत आहे. दरम्यान, या अनपेक्षित घटनेमुळे पोलीस देखील चक्रावून गेले असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
या प्रकरणातील मुलगा आणि मुलगी एकमेकांच्या शेजारी राहत असत, तसेच ऑनलाईन शिक्षणासाठी देखील एकत्र येत असत, अशी माहिती आहे. अत्याचाराच्या घटनेनंतर मुलीने त्रास होत असल्याचे घरच्यांना सांगितले, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला, असे पोलिसांनी सांगितले.
मुलांकडून हा अपराध अजाणतेपणी झालाय की त्याने जाणीवपूर्वक हा गुन्हा केला, याचा तपास करणं या गुन्ह्यातील मोठे आव्हान आहे.
त्यासाठी पोलीस बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांसह मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेत आहेत. यातील अत्याचाराचा आरोप असलेल्या मुलाचे वय अवघे अकरा वर्षं असल्याने त्याला पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतरच कायदेशीर कारवाई होणार आहे. सध्या पोलिसांनी मुलीच्या पालकांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्याच्या तपासासाठी तज्ज्ञ अशा वकिलांची देखील मदत घेण्यात येत आहे.
Comment here