आरोग्यताज्या घडामोडीदेश/विदेशपुणे

धक्कादायक: …म्हणून श्रीमंत आणि शक्तीशाली लोकांकडून अदर पूनावाला यांना धमक्या, भारताबाहेर लसीचे उत्पादन करण्याचा विचार

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

धक्कादायक: …म्हणून श्रीमंत आणि शक्तीशाली लोकांकडून अदर पूनावाला यांना धमक्या, भारताबाहेर लसीचे उत्पादन करण्याचा विचार

भारतासाठी धक्कादायक बातमी आहे. भारतातील 90 टक्के कोरोना लसींचं उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्युटचे प्रमुख आदर पुनावाला यांनी भारतातील श्रीमंत आणि शक्तीशाली लोकांकडून धमक्या मिळत असल्याचं सांगितलंय. तसेच यामुळे आगामी काळात भारताबाहेर ब्रिटनमध्ये कोरोना लसीचं उत्पादन करण्याबाबत सूचक इशारा दिलाय. ते आंतरराष्ट्रीय मॅगेझिन टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. पुनावाला जगातील सर्वात मोठे कोरोना लस उत्पादक आहेत.

आदर पुनावाला म्हणाले, “भारतातील सर्वात श्रीमंत आणि शक्तीशाली लोकांपैकी काही जणांकडून धमक्या येत आहेत. यात काही राज्यांचे मुख्यमंत्री, काही उद्योग समुहांचे प्रमुखांचा समावेश आहे. हे सर्व सीरमच्या एस्ट्रा झेनेका म्हणजेच कोविशिल्ड लसीचा तातडीने पुरवठा मागत आहेत. यांना धमकी म्हणणंही कमी ठरेल. आक्रमकपणा आणि अपेक्षांचा स्तर अभूतपूर्व आहे.”

दरम्यान, आदर पुनावाला यांना सातत्याने मिळत असलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वीच त्यांना वाय सुरक्षा व्यवस्था देण्याची घोषणा केलीय. त्यामुळे त्यांना संपूर्ण भारतात सीआरपीएफच्या (CRPF) जवानांकडून सुरक्षा पुरवली जाईल. पुण्यातील सीरमचे संचालक प्रकाश कुमार सिंग यांनी 16 एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून पुनावाला यांना सुरक्षा व्यवस्था पुरवण्याची मागणी केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला.


वाय सुरक्षा पुरवल्याने यापुढे देशात कुठेही गेले तरी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सशस्त्र जवान पुनावाला यांच्यासोबत कायम असतील. या सुरक्षा पथकात 4-5 जवानांचा समावेश असेल.

litsbros

Comment here