करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । युट्युब । व्हाट्सएप
करमाळा तालुक्यातील कोर्टी गावात ‘हे’ ४ दिवस होणार कोरोना लसीकरण, पूर्व नोंदणी असणार अनिवार्य
कोर्टी व परिसरातील वय वर्षे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना सुचीत करण्यात येत आहे की उद्या शनिवार दि.८ मे ते बुधवार दि.१२ मे २०२१ पर्यंत कोरोना लसीकरण कोर्टी प्राथमिक आरोग्य केंद्रात केले जाणार आहे. वरील वयोगटातील ज्या नागरिकांनी ऑनलाईन रजीस्ट्रेशन केले आहे व ज्यांना त्या तारखेची अपाईंट मेंट मिळाली आहे त्या नागरिकांना त्या तारखेला लस दिली जाईल.
दुसरा डोस अगर ४५ वयाच्या नागरिकांना लस नंतर दिली जाईल.येताना आधार कार्ड ,मास्क आवश्यक आहे. बाकीच्यांनी विनाकारण गर्दी करु नये. सकाळी ९.०० वा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित रहावे.
वैदयकीय अधिकारी
प्राथमिक आरोग्य केंद्र
कोर्टी.
Comment here