आरोग्यकरमाळा

करमाळयातील व्यापाऱ्यांसह ‘या’ सर्वांना कोरोना चाचणी अनिवार्य; ‘या’ कालावधीत होणार चाचणी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळयातील व्यापाऱ्यांसह ‘या’ सर्वांना कोरोना चाचणी अनिवार्य; ‘या’ कालावधीत होणार चाचणी

करमाळा नगरपरिदेच्या वतीने शहरातील व्यापाऱ्यांकरिता कोरोना चाचणी शिबिराचे आयोजन.
देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने मा. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब यांचे आदेशानुसार करमाळा शहरांतील व्यापारी यांची कोरोना चाचनी दिनांक १ एप्रिल ते ५ एप्रिल या काळात जूनी नगरपालिका इमारत पुणे रोड येथे सकाळी १० ते १२ या वेळेत होणार आहे. सदर चाचणी केलेनंतर त्याचा चाचणी अहवाल देण्यात येणार असून तो अहवाल दुकानाच्या दर्शनी भागावर लावणे बंधनकारक आहे,

तरी शहरातील सर्व व्यापारी , फळ विक्रेते, भाजी विक्रेते ,फेरीवाले’, टपरीधारक, सलून धारक ,ब्युटी पार्लर धारक,यांनी कारोना चाचणी करून घ्यावी असे आव्हाहन मा.प्रांत मँडम ज्योती कदम, मा.तहसिलदार समीर माने व मुख्याधिकारी वीणा पवार यांनी केले आहे. याचबरोबर करमाळा शहरातील सर्व कार्यालयातील, पोलीस, बँक, नगरपरिषद, पंचायत समिती ,पोस्ट, कृषिउत्पन्न बाजार समिती, वीज वितरण, mseb , सर्व शाळा व काँलेज कर्मचारी यांनी देखील कोरोना चाचणी करणे अनिवार्य आहे.
कोरोना चा वाढता संसर्ग रोकणे कामी कोरोना चाचणी करणे व बाधित रूग्णास लवकरात लवकर उपचार देणे याकरीता सदर कोरोणा चाचणी शिबीर आयोजीत करण्यात आले आहे.

litsbros

Comment here