आरोग्यताज्या घडामोडीदेश/विदेश

ओमिक्रोन विषाणूचा वाढता धोका पाहता केंद्राने राज्यांना दिले ‘हे’ निर्देश

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

ओमिक्रोन विषाणूचा वाढता धोका पाहता केंद्राने राज्यांना दिले ‘हे’ निर्देश

 देशात हळूहळू Omicron या विषाणूची लागण झालेले रुग्ण वाढू लागले आहेत. असं असताना आता केंद्र सरकारने राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना सावधानतेचा सल्ला दिला आहे. ओमायक्रॉनचे वाढते रुग्ण पाहता केंद्राने राज्यांना रात्री कर्फ्यू लागू करण्याचे तसेच मोठ्या सभा आणि कार्यक्रमांवर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. 


केंद्र सरकारने राज्याना ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनवर होणारी गर्दी पाहता स्थानिक स्तरावर निर्बंध लागू करण्याच्या ही सूचना केल्या आहेत.
ओमायक्रॉनची वाढती प्रकरणं आता चिंता वाढवत आहे. या व्हायरस फार वेगाने पसरतो. त्यामुळे केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच जिल्हा स्तरावर कोरोनाच्या पॉझिटिव्ह रेटनुसार नियंत्रण ठेवण्याच्या सूचना ही दिल्या आहेत.


केंद्राने म्हटलं की, राज्यात मोठ्या कार्यक्रमांवर निर्बंध आणण्याची गरज आहे. कंटेनमेंट झोनबाबत राज्यांना सल्ला देण्यात आला आहे की, ज्या भागात रुग्ण वाढत असतील त्या भागात कंटेनमेंट झोन आणि बफर झोन घोषित करावे. तसेच लवकरात लवकर कोरोनाची लस देण्यावर भर देण्यात यावे.


देशात अनेक राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. पण ओमायक्रॉनने सरकारच्या चिंता पुन्हा वाढवल्या आहेत. लसीकरण हाच एकमेव सध्या मार्ग असल्याने यावर अधिक भर दिला जात आहे.

litsbros

Comment here