करमाळाधार्मिकसोलापूर जिल्हा

कोरोना महामारी चे संकट दूर व्हावे’ अशी प्रार्थना करत करमाळा शहरातील चिमुकलीने केले रोजे पूर्ण व कुराणाचे वाचन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

‘कोरोना महामारी चे संकट दूर व्हावे’ अशी प्रार्थना करत करमाळा शहरातील चिमुकलीने केले रोजे पूर्ण व कुराणाचे वाचन

करमाळा( प्रतिनिधी )संपूर्ण राज्यभरातील कोरोना महामारी चे संकट दूर होण्यासाठी व राज्यभरातील तमाम नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने करमाळा येथील कुमारी अरहाना शेख हीचे रमजान महिन्यातील पूर्ण रोजे व कुराण वाचन पूर्ण केले आहे
इस्लाम धर्मातील पाच महत्त्वाच्या तत्त्वांपैकी रोजा याला विशेष महत्त्व दिलेले आहे.

परंतु लहान मुलावर फर्ज नसणारे रोजे ही मुले करतात त्यामुळे त्यांचे कौतुक केले जाते असा हा कडक रमजान महिन्यातील रोजा अरहाना हिने लहान वयात पूर्ण केला आहे
अवघ्या लहान वयात पूर्ण रोजे व कुरान वाचन केल्याने तिचे सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे.

करमाळा शहरातील नगरपालिका उर्दू शाळा येथे इयत्ता चौथी मध्ये शिकत असलेली अरहाना हिने रमजान महिन्यातील पहिल्या रोजा पासून आजपर्यंत एकूण 28 रोजे पूर्ण केले असून उर्वरित पूर्ण रोजे करण्याचा तिचा संकल्प आहे.

करमाळा शहरातील खाटीक गल्ली येथील हाजी इमरान शेख( घोडके) यांची ती मुलगी असून हाजी अब्दुल मजीद शेख( घोडके) यांची ती नात आहे.

घोडके यांच्या कुटुंबात सर्व परिवार धार्मिक प्रवृत्तीचे असून तीच परंपरा जोपासत कुमारी अरहाना तिने अवघ्या लहान वयात रमजान महिन्यातील कडक असे पवित्र रोजे तसेच संपूर्ण कुराणाचे वाचन केले आहे
करमाळा शहरातील नगरपालिकेच्या उर्दू शाळेत कुमारी अरहाना ही इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत आहे अरहाना हिने सदरचे रोजे घरातच केले आहे.

अवघ्या लहान वयात रोजी व कुराण पूर्ण केल्याबद्दल तिचे करमाळा येथील धर्मगुरू मौलाना मोहसीन शेख तसेच हाजी सादिक शेख तसेच हाजी अतिक बेग यांनी तिचे विशेष तोंडभरून कौतुक केले आहे.

हेही वाचा-बेरोजगारीला त्रासून पत्नी आणि मुलाचा खून करून स्वतः केली आत्महत्या; सोलापूर जिल्ह्यातील परिवाराचा लोणी काळभोर येथे अंत

दुचाकीस्वाराने धडक दिल्याने एकाचा मृत्यू, कुर्डूवाडीतील दुर्दैवी घटना

राज्यातील तसेच संपूर्ण भारतातील महामारी कोरोनाचे संकट अल्लाह (परमेश्वर )दूर करेल या हेतूने कुमारी शेख हिने रमजान महिन्यातील पूर्ण रोजे करण्याचा संकल्प केला आहे.

कुमारी अरहाना शेख हिने पूर्ण रोजे व कुराण वाचन केल्याबद्दल तिचे जामा मशीद ट्रस्टच्यावतीने सत्कार करण्यात आला.

litsbros

Comment here