करमाळाक्राइम

कोरोना रुग्णांना जबरदस्तीने घरी घेऊन जाणे महागात; करमाळ्यातील ‘या’ नेत्यांसह सात जणांवर गुन्हा दाखल

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कोरोना रुग्णांना जबरदस्तीने घरी घेऊन जाणे महागात; करमाळ्यातील ‘या’ नेत्यांसह सात जणांवर गुन्हा दाखल

करमाळा(प्रतिनिधी); सरकारी डॉक्टर शैलेश प्रकाश देवकर वय 43 धंदा नोकरी राहणार किल्ला विभाग करमाळा यांनी दिलेल्या तक्रारी नुसार, सरकारी कामात अडथळा आणणे, कोरोना रुग्णांना जबरदस्ती आपल्या वाहनात बसवून सेंटर मधून घरी घेऊन जाणे यानुसार नागर्स6 व भाजप नेते गणेश चिवटे यांच्यासह सात जणांवर करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश चिवटे रा. राशिन पेठ करमाळा, खाजगी वाहन चालक शिवाजी क्षिरसागर (कुंभार ) रा.भवानी पेठ करमाळा, इतर पाच जण सर्व राहणार करंजे तालुका करमाळा. सदर प्रकार दिनांक 19/03/2021 रोजी सकाळी 04/30वा. सुमारास मौजे करमाळा येथील आंबेडकर covid- केयर सेंटर ता.करमाळा येथे घडला आहे.

यात हकिकत अशी की, चिवटे यांनी कोरोना केअर सेंटर येथे बेकायदेशीररित्या प्रत्यक्ष येऊन कोरोना रोगाची बाधा असताना सुद्धा सदर पाच पेशंटला होम कोरंटाईन करण्याचा आग्रह धरून सदर पेशंटला कोरंटाईन करण्यासाठी घरी घेऊन जाऊ द्या, असे म्हणाले असता यातील फिर्यादी व कोविड सेंटर स्टाफ असे सर्वजण तुम्हाला सदर पेशंटला घरी घेऊन जाता येणार नाही असे म्हणाले असता चिवटे यांनी अनाधिकाराने सदर रुग्णांना तुम्ही घरी जावा बघू काय करतात ते पुढचे माझे मी पाहून घेतो असे म्हणत चालकाला पाच रुग्णांना घरी घेऊन जाण्यास सांगितले.

त्यानंतर लोकप्रतिनिधी कडुन अशी अपेक्षा नसल्याचे म्हणाल्यानंतर चिवटे हे डॉक्टरांच्या अंगावर धावून आले व दमदाटी करून म्हणाले मी मीडिया बोलावून तुमची बदनामी करून कोविड केअर सेंटर ची वाट लावतो असे म्हणत फिर्यादी काम करत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणून जबरदस्तीने कोरणा बाधित रुग्णांना तुम्ही घरी चला असे म्हणत स्वतःचे वाहनात बसवून पाठवले आहे.

हेही वाचा-करमाळा तालुक्यातील दिवेगव्हानमध्ये मोराला बसला शॉक; ‘या’ पक्षीप्रेमींनी उपचार करून दिले जीवदान

अखेर करमाळा पोलीस निरक्षक श्रीकांत पाडूळे यांची कुर्डूवाडी येथे बदली, तर करमाळयाला ‘हे’ नवे पोलीस निरीक्षक

यावरुन त्या पाच जणासह भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे व चालकावर भादवि कलम 353, 269, 212,188,143, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51( ब ), साथीचे रोग अधिनियम 1897 कलम 2, 3, 4 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे.

litsbros

Comment here