आरोग्यकरमाळा

कोरोनाचा नवा व्हेरियंट! व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकही धास्तावले

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कोरोनाचा नवा व्हेरियंट! व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकही धास्तावले

केतूर (अभय माने) कोरोनाच्या नव्या व्हेरियंण्टमुळे सरकारकडून खबरदारी संदर्भात उपाययोजना आदेश जारी केले असले तरी स्थानिक प्रशासनाकडून मात्र याबाबत कोणत्याही सूचना नाहीत मात्र यामुळे निर्बंध लागू झाल्यास होणारे व्यवसाय पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडणार आहेत त्यामुळे व्यवसायिक धास्तावले आहेत.

कोरोनाची दुसरी लाट संपल्यानंतर जवळजवळ सर्व निर्बंध हटविण्यात आल्याने शाळा ,रेल्वे ,सिनेमागृह आता कुठे सुरळीत सुरु होत असताना मुंबई, पुण्यासह राज्यात परदेशातून आलेल्या प्रवाश्यापैकी काही रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्याने सर्वांची चिंता वाढली आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज सपशेल फेल गेला असतानाच आता आफ्रिका देशातून कोरोनाचा नवा अवतार (ओमिक्रोन) आल्याने प्रशासनाने देखील वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवली आहे. एकूणच या नव्या वातावरणामुळे व्यवसायिकांसह सर्वसामान्य नागरिक मात्र धास्तावले आहेत.

राज्यात डोंबिवलीतील 30 वर्षीय तरुणाला ओमायक्रोनचा संसर्ग झाल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा मात्र सतर्क झाली आहे. असे असले तरी याबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

litsbros

Comment here