महाराष्ट्रमुंबईराज्यसोलापूर जिल्हा

कोरोनाच्या नव्या व्हेरियंट चा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकारची जनतेला नवी नियमावली; वाचा सविस्तर नवे नियम

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कोरोनाच्या नव्या व्हेरियंट चा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकारची जनतेला नवी नियमावली; वाचा सविस्तर नवे नियम

दक्षिण आफ्रिकेत कोरोणाचा एक नवा व्हेरीएंट आढळला आहे. त्यामुळे जगावर पुन्हा एक मोठं संकट येऊन उभारले आहे. हा नवीन व्हेरीएंट जगभरात हळू हळू पाय पसरत आहे. याधीच केंद्र सरकारने सावधानतेचा इशारा दिला आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या व्हेरीएंट संधर्भात एक बैठक घेऊन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. केंद्राच्या सल्ल्यानुसार महाराष्ट्र राज्यात देखील या सूचनांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे.

राज्य सरकारने या व्हेरीएंटची घातकता पाहून राज्यात नवीन नियमावली जाहीर केली आहे. तसेच नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. जर तुम्ही लसीचे दोन डोस घेतले असतील तरच तुम्हाला सार्वजनिक वाहांनमध्ये प्रवास करता येणार आहे.

• अशी आहे नवी नियमावली?

1) लोकल ट्रेन, बस, टॅक्सी, रिक्षा यामध्ये प्रवास करायचा असेल तर दोन लसीचे डोस घेतलेले असावेत. नसतील घेतले तर प्रवास करता येणार नाही.

2) जे कोणी कोरोणाचे नियम पाळणार नाहीत. अशांना दंडाच्या रकमेत वाढ करण्यात येईल.

3) टॅक्सी मध्ये मास्क लावणे बंधनकारक आहे. जर मास्क लावलेला नसेल तर प्रवाशाला 500 रुपये तर टॅक्सी चालकाला 500 रुपये दंड आकारला जाणार आहे.

4) कोणत्याही दुकानात जाताना मास्क लावणे बंधनकारक आहे. जर मास्क लावला नसेल तर ग्रहकाला 500 रुपये दंड आणि दुकान मालकाला 10 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.

5) मॉलमध्ये ग्राहकाला मास्क नसेल तर चालकाला 50 हजारांचा दंड आकारण्यात येईल.

6) सभा, तसेच जाहीर कार्यक्रम यांना नियम पाळून परवानगी देण्यात आली आहे.

7) कार्यक्रमावेळी नियम न पाळणाऱ्या नियोजकाला 50 हजार दंड तसेच कार्यक्रम बंद करण्याचा अधिकार स्थायी प्रशासनाला दिला आहे.

litsbros

Comment here