आरोग्यकरमाळा

कोरोनामुळे नववधूवरांच्या हातावर मेहंदी ऐवेजी सॅनिटायझर लावण्याची वेळ; कोरोनाच्या धास्तीने अनेक लग्न सोहळे रद्द

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कोरोनामुळे नववधूवरांच्या हातावर मेहंदी ऐवेजी सॅनिटायझर लावण्याची वेळ; कोरोनाच्या धास्तीने अनेक लग्न सोहळे रद्द

जेऊर(प्रतिनिधी) कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने ब्लॉक डाऊन सुरू केले सामाजिक व धार्मिक कार्यावर निर्बंध आले.

त्यामुळे काही जण केवळ मोजक्याच लोकांमध्ये लग्नसोहळे लग्न सोहळे उरकत आहेत तर बहुतेक करुन लग्न सोहळे पुढे मोठ्या प्रमाणात ढकलत आहे, परिणामी मेहंदी लावण्याच्या हातावर आता चक्क सॅनिटायझर लावण्याची वेळ आली आहे साधारणता दिवाळी पासूनच लग्न कार्याला सुरुवात होते मार्च ते मे मागील वर्षी कोरोना चा शिरकाव झाला होता परंतु 50 लोकांची परवानगी असल्याने काही प्रमाणात लग्न सोहळे पार पडले परंतु सप्टेंबर मध्ये कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाली होती सर्व सुरळीत सुरू झाले.

 

त्यामुळे सहा महिन्यापासून वधू-वर पित्याची विवाहाची तारीख निश्चित करून मंगल कार्यालय बुक केले होते लग्नसराईची लगबग व धावपळ ही बऱ्याच प्रमाणात सुरू होती मात्र फेब्रुवारी मार्च एप्रिल 2021 या महिन्यात कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढीस लागली त्यामुळे शासनाकडून लॉकडाउन व कडक निर्बंध लागू करण्यात आले त्यामुळे वधू-वर पित्यासाठी चिंतेचा विषय ठरला आहे कोरोना मुळे घराच्या बाहेर निघण्यास बंदी आहे.

हेही वाचा- करमाळयात समता परिषदेतर्फे भाजपचे चंद्रकांत पाटील यांचा निषेध

BREAKING NEWS; अखेर भाजपचे समाधान अवताडे ‘इतक्या’ मतांनी विजयी; क्लिक करून वाचा सविस्तर

त्यामुळे विवाहाच्या निमित्ताने अनेकांनी पत्रिका कपड्याचे बसते व विविध प्रकारची तयारी केली होती वधू-वर ही आपापल्या परीने तयारीला लागले होते अशाच लोक डाऊन सुरू झाले त्यामुळे विवाह योग्‍य युवक युतीच्या आनंदावर विरजण पडले आहे .

विवाह सोहळे रद्द झाल्याने कपडा सोने सौंदर्यप्रसाधने मंगल कार्यालय बँड केटरिंग आचारी बांगड्या भांडी फर्निचर यांच्यासह आदी दुकानावर मोठा परिणाम झाला आहे त्यामुळे कमाईच्या सीझनमध्ये आर्थिक अडचणींना मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागत आहे असे आलेश्वर येथील स्वर संगम डिजिटल बेंजो चे व्यवस्थापक सादिक मुलानी यांनी बोलताना सांगितले.

litsbros

Comment here