आरोग्यकरमाळाशेती - व्यापार

कोरोना लसीकरणासाठी करमाळा शहर व तालुक्यातील व्यापारी वर्गाचा प्रामुख्याने विचार करावा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कोरोना लसीकरणासाठी करमाळा शहर व तालुक्यातील व्यापारी वर्गाचा प्रामुख्याने विचार करावा

करमाळा(प्रतिनिधी);
कोविड 19 महामारीला बघता बघता 1 वर्ष पूर्ण झाले.या महामारी मध्ये व्यापाऱ्यांनी शासनाचे नियम पाळून वेळोवेळी जनतेला प्रामाणिकपणे सेवा देण्याचा प्रयत्न केला.

काही दिवसापूर्वी ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि व्याधी ग्रस्तांसाठी केंद्र शासनामार्फत पूर्ण देशामध्ये लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे.यामध्ये व्यापारी बांधवांचा प्रामुख्याने विचार करण्यात यावा,अशी मागणी भाजपा व्यापार आघाडी चे शहराध्यक्ष जितेश कटारिया यांनी केली आहे.

लॉकडाऊन काळापासून ते आजतागायत सर्व प्रकारचे व्यापारी स्वतः कोरोनाचे सर्व नियम पाळून नागरिकांना सेवा देत आहेत.

ज्या पद्धतीने लॉकडाऊन नंतर प्रशासनाने व्यापारी वर्गाच्या कोविड 19 च्या सामूहिक चाचण्या करण्यासाठी आवाहन केल्यानंतर व्यापारी वर्गाने उस्फुर्त प्रतिसाद दिला.

हेही वाचा-कोरोना प्रतिबंधासाठी काळजी आणि लसीकरणाचे आवाहन; उपक्रमशील शिक्षिका अनुराधा शिंदे करताहेत घरोघरी जनजागृती

करमाळा महसूल विभागाची अवैध वाळू तस्करावर कारवाई; तीन यांत्रिक बोटी खोल पाण्यात बुडवून नष्ट

 त्याच पद्धतीने प्रशासनाने वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता व्यापारी वर्गाचा कोविड 19 लसीकरणासाठी प्रामुख्याने विचार करावा अशी मागणी श्री.कटारिया यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.

litsbros

Comment here