करमाळासोलापूर जिल्हा

कोरोनामुळे ग्रामीण अर्थकारणावर विपरीत परिणाम; महागाईचा आगडोंब, करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील अर्थकारण ठप्प

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कोरोनामुळे ग्रामीण अर्थकारणावर विपरीत परिणाम; महागाईचा आगडोंब, करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील अर्थकारण ठप्प

केतूर (अभय माने) कोरोना काळात छोटे व्यवसायिक, शेतमजूर, शेतकरी या सर्वांवर संकटाची वेळ आली आहे.कोरोना काळात कोणत्याही पिकाला योग्य दर मिळाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांची फळे-भाजीपाला बांधावर टाकायची वेळ आली होती मात्र रोज लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या दर वरचेवर वाढत होत आहेत.

या महागाईच्या आगडोंबात शेतकरी, शेतमजूर,याबरोबरच सर्वसामान्य नागरिक अक्षरशः होरपळून निघत आहेत. त्यामुळे ग्रामीण अर्थकारणावर या सर्वांचा दूरगामी परिणाम होण्याचे संकेत मिळत आहेत.

हेही वाचा- करमाळयाच्या सुयश सोबत मंत्री जयंत पाटील यांनी साधला व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे संवाद; यशासाठी दिल्या शुभेच्छा

पंढरपूर शहरात ‘या’ कालावधीत एसटी, खाजगी वाहतूक राहणार बंद;जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

सध्या खाद्यतेल ( गोडे तेल ),डाळी, चहा पावडर, दूध याबरोबरच भाज्या, फळे आदि जीवनावश्यक वस्तूंच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती वापराच्या गॅस सिलिंडर च्या दरातही रोजच वाढत आहे.इंधनाच्या दरात होत असलेली वाढ ही मागणी वाढण्यास कारणीभूत ठरत आहे.

कोरोनामुळे उत्पन्नात मोठी घट झाली आहे तर खर्चात मात्र भरमसाठ वाढ होत आहे रोजगारासाठी शहराच्या ठिकाणी गेलेली मंडळी रोजगार गेल्याने गावाकडे येऊन थांबली आहेत.वर्षभरात रोज लागणाऱ्या खाद्यतेलाच्या दारात विक्रमी वाढ झाल्याने किचनचे बजेट वाढले आहे. शेतात मजुरी करणाऱ्या महिला मजुरीच्या दरात एक किलोही गोडेतेल खरेदी करता येत नाही ही शोकांतिका आहे. तर डाळीच्या किमतीही वरचेवर वाढत आहेत .

शरीरात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी फळे, भाज्या घ्याव्या म्हटले तर याचे दरही वरचेवर वाढत आहेत. दुधाचे दर कमी झाले असले तरी, त्याचा शेतकऱ्या तोटा शेतकऱ्यांनाच होत आहे तर विक्रेत्यांना मात्र फायदा होत आहे.

एकूणच कोरोनामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असून ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यास बराच वेळ जाणार असल्याचे जाणकार सांगत आहेत.

litsbros

Comment here