करमाळामाणुसकीसोलापूर जिल्हा

कोरोना काळात जनतेची मदत करत, २७ मुलांना दत्तक घेणारे करमाळा येथील जयकुमार कांबळे

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कोरोना काळात जनतेची मदत करत, २७ मुलांना दत्तक घेणारे करमाळा येथील जयकुमार कांबळे

करमाळा(प्रतिनिधी) ; सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, ९ मे पासुन संपुर्ण सोलापूर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. परंतु सतत होणाऱ्या या लॉकडाऊनमुळे गोरगरीब जनता अन्नपाण्यावाचुन मरत असल्याचे सध्याचे सर्वत्र चित्र निर्माण झाले आहे. आणि सद्यस्थितीला माणुस माणसाजवळ थांबण्यासाठी भीत आहे. असे काही दृश्य पाहिले असता, वाटते कि, माणुसकी संपत चालली आहे.

परंतु अशा परिस्थितीमध्ये सुध्दा ज्या लोकांना लॉकडाऊनमुळे इतरत्र कोठेही जाता येत नाही. अन्नपाण्यासाठी एकमेकांच्या तोंडाकडे पाहत बसावे लागते. आणि अशा वेळेस जर अचानक कोणीतरी येऊन, थोडी जरी मदत केली.

तर ती मदत गरजवंत व्यक्ति कधीही विसरणार नाही. असाच काहीसा माणुसकी जिवंत ठेवण्याचा प्रकार करमाळा शहरात जयकुमार कांबळे यांच्यावतीने केला जात आहे. कोणताही व्यक्ति जनतेची सेवा करण्यासाठी निवडुन येण्याची वाट पाहत असतो.

निवडुन आल्यानंतर ते व्यक्तिमत्व जनतेची थोडीफार कामे करत असते. परंतु करमाळ्यातील जयकुमार कांबळे हे कोणत्याही पदाशिवाय जनतेला गरज असेल, त्या ठिकाणी जाऊन, नागरिकांना त्यांच्यातर्फे जेवढी मदत शक्य होईल तेवढी करत असतात.

करमाळा बस स्टँड समोर अत्यंत हलाखीचे जीवन जगणारे एक कुटूंब आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सहसा त्या कुटूंबाकडे कोणीही ढुंकूण ही पाहत नाही.

परंतु जयकुमार कांबळे नेहमी या कुटूंबाची आस्थेने विचारपुस करतात. व त्या कुटूंबासाठी कांबळे हे त्यांना शक्य असेल. तेवढी मदत नेहमी करत असतात.

दुसरे उदा. सांगावयाचे झाल्यास करमाळ्यातील मौलाली माळ येथील ज्या कुटूंबाना मुलांना शिकविण्याची इच्छा आहे. परंतु परिस्थितीमुळे मुलांना शिक्षण देता येत नाही. अशा २७ मुलांना जयकुमार कांबळे यांनी दत्तक घेतले आहे. तसेच यांच्या कार्याचा आढावा घेतला असता, कांबळे हे करमाळा आगारात कर्मचारी आहेत. त्यामुळे ते त्यांच्या पगारातुन कुटूंबाची गरज भागवून उरलेली रक्कम समाजकार्यासाठी खर्च करतात.

आजपर्यंत त्यांनी अनेक रक्तदान शिबीरे, आरोग्य तपासणी शिबीरे तसेच नेत्ररोग तपासणी शिबीरे घेतली आहेत. त्यामुळे जयकुमार कांबळे यांची समाजात एक सच्चा समाजसेवक म्हणून ओळख आहे.

हेही वाचा-.. म्हणून सकाळी दफन केलेला मृतदेह सायंकाळी काढावा लागला उकरुन

करमाळा तालुक्यातील रावगाव येथील कोविड सेंटरचे पारनेरचे आ.निलेश लंके यांच्या हस्ते उद्घाटन

कांबळे हे सुध्दा प्रामाणिकपणे कबुली देताना सांगतात कि, मी हे सर्व समाजकार्य स्व. दिगंबरराव बागल (मामा) यांच्या प्रेरणेतुन करत आहे, व या कार्यासाठी मला माझी पत्नी नगरसेविका सविता कांबळे ही सतत मोलाची साथ देत असते. त्यामुळे ज्या ठिकाणी जनतेला माझी गरज असेल, तेथे मी माझ्या वतीने जेवढे सहकार्य करता येईल. तेवढे सहकार्य करण्यासाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे मत जयकुमार कांबळे हे व्यक्त करतात.

litsbros

Comment here