करमाळा

कोरोना कालावधीत अभिनव भारत समाजसेवा मंडळाचे कार्य अनुकरणीय; पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कोरोना  कालावधी मध्ये अभिनव भारत समाज सेवा मंडळाचे कार्य अनुकरणीय; पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे

केतूर ( अभय माने) ; रिलायन्स फाऊडेशन  व अभिनव भारत सामाज सेवा मंडळ, सालसे यांचे संयुक्त विद्यमाने कोरोना प्रधुर्भावाच्या पार्श्वभूमीवर करमाळा येथील दत्त मंदिर येथे ३०  कुटुंबाना जीवन आवश्यक किराणां वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वाटप कार्यक्रमात ते बोलत होते

  यावेळी करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे, मुख्याधिकारी विणा पवार, पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे, नासीर कबीर यांचे हस्ते करमाळा शहरातील वयोवृद्ध, दिव्यांग व गरजू कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमासाठी पोलीस हवालदार मारुती रणदिवे, संस्थेच्या खजिनदार सारिका चेंडगे, निशिगंधा शेंडे, इसाक पठाण उपस्थित होते. तर करमाळा शहरातील राशीन पेठ येथे सामाजिक कार्यकर्ते राधेशाम देवी, श्रीराम प्रतिष्ठान चे गणेश चिवटे, अभिनव भारत समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष संतोष राऊत व मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक सालगुडे यांचे हस्ते २१ वयोवृद्ध लोकांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.

तर नियोजन नगर या ठिकाणी महात्मा फुले समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रमोदजी झिंजाडे, मनोहर ढवळे व सचिन झिंजाडे यांचे हस्ते ३० किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. तर  मंगळवार पेठ  या भावात ९ असे एकूण ९० किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. 

या किराणा साहित्याच्या वाटपासाठी नरेंद्र जगदाळे, अनिल शेंडे, दशरथ कोळी, शिवराज राऊत, नम्रता शेंडे, भूषण बारेला यांनी परिश्रम घेतले.  

litsbros

Comment here