चिकलठाण आरोग्य शिबिरात ‘इतक्या’ रुग्णांची झाली तपासणी; 632 लोकांना चष्म्या वाटप

चिकलठाण आरोग्य शिबिरात ‘इतक्या’ रुग्णांची झाली तपासणी; 632 लोकांना चष्म्या वाटप

केतूर (अभय माने) शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या वतीने गावोगावी होत असलेले आरोग्य शिबिरामधून सर्वसामान्य जनतेला लाभ मिळत असून खऱ्या अर्थाने सर्वसामान्याला धावून जाण्याचे काम या माध्यमातून होत आहे अशा शिबिरांचे आयोजन वारंवार झाली पाहिजे असे मत करमाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजते यांनी व्यक्त केले

चिकलठाण येथे आयोजित आरोग्य शिबिराचे उद्घाटन गुंजोटी यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते
तहसीलदार संजय जाधव
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता वामन उबाळे ज्येष्ठ पत्रकार नाशिर कबीर, सेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, शिवसेना वैद्यकीय कार्यालय प्रमुख लक्ष्मण सुरवसे युवा पत्रकार नागेश शेंडगे
चिकलठाण सोसायटीचे चेअरमन विकास गलांडे आदिनाथ कारखान्याचे माझी चेअरमन केरू गव्हाणे माधवराव कामटे आधीच उपस्थित होते

वेळी बोलताना राजेंद्र बारकुंड म्हणाले की
संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गेली अडीच वर्षात आरोग्याचे मोठे का महाराष्ट्रात उभा राहिले असून सर्वसामान्य लोकांना मोफत उपचार मिळत आहेत याचाच एक भाग म्हणून चिकलठाण येथे आरोग्य शिबीर आयोजित केली असून वैद्यकीय कक्ष प्रमुख मुख्यमंत्र्यांची विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे च्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण करमाळा तालुक्यात सर्वसामान्य गोरगरिबांना रुग्ण सेवा मिळत आहे

आजच्या शिबिरात जवळपास तीन लाख रुपयांची औषधे मोफत वाटण्यात आली व जवळपास सातशे रुग्णांना मोफत चष्मे देण्यात आली शिवाय मोतीबिंदू असलेल्या लोकांना मोफत डोळ्याचे ऑपरेशन करून देण्याची मुद्रायणी हॉस्पिटल पुणे येथे करण्यात आली आहे

इसीजी मशीन द्वारे 28 रुग्णांची तपासणी करण्यात आली लोकांना उपचारासाठी गोळ्या देण्यात आले

सर्पदंशा साठी मोफत उपचार देण्याची घोषणा केल्याबद्दल राज्याची आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांचे चिखलठाण ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले

हेही वाचा – तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे करमाळा येथे आयोजन; शिक्षणाधिकारी सोलापूर यांचे हस्ते होणार पारितोषिक वितरण

डिकसळ- कोंढार चिंचोली नविन पुलाच्या निविदा प्रस्तावास मंजुरी; आ.संजय मामा शिंदे यांची माहिती; 3 जिल्ह्यांना जोडणारा मार्ग होणार सुकर, वाचा सविस्तर

संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करमाळा तालुक्यातील विविध हॉस्पिटल मधील दाखल असलेल्या रुग्णांना 70 लाख 80 हजाराची मदत दिल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानण्यात आली

//
आरोग्य शिबिराचे आयोजन केल्याबद्दल जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांचा सत्कार चिकलठाण ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला या शिबिरात चाळीस डॉक्टरांनी आपली सेवा दिली व शेकडो अशा वर्कर उपस्थित होत्या.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line