मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न;नाशिक जिल्ह्यातील ‘ या ‘ दांपत्याला मिळाला शासकीय पूजेचा मान
पंढरपूर – आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शुभहस्ते सपत्नीक श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेची महापुजा संपन्न झाली. यावर्षी नाशिक जिल्ह्यातील उगले दांपत्याला मानाचे वारकरी होण्याचा सन्मान मिळाला.
यंदा आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी म्हणून नाशिक जिल्ह्यातील कैलास दामू उगले आणि त्यांची पत्नी कल्पना उगले यांना महापूजेचा मान मिळाला. उगले दाम्पत्य गेल्या १२ वर्षापासून नियमितपणे वारी करत आहेत. नाशिकला सलग दुसऱ्या वर्षी मानाचे वारकऱ्याचा मान मिळाला आहे.