छत्रपती संभाजीराजे यांच्या शुभहस्ते रेश्मा दास यांच्या ‘सुमी” पुस्तकाचे प्रकाशन

छत्रपती संभाजीराजे यांच्या शुभहस्ते रेश्मा दास यांच्या ‘सुमी” पुस्तकाचे प्रकाशन

रोपळे (क) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वारुढ पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याचे औचित्य साधून त्या ठिकाणी सुप्रसिद्ध कवयित्री, लेखिका- रेश्मा दास लिखित चरित्रचित्रण ‘सुमी’ या पुस्तकाचे प्रकाशन सन्माननीय छत्रपती संभाजी राजे कोल्हापूर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

त्याचबरोबर रेश्मा दास यांच्या मातोश्री सुमन भिमराव दास यांना ‘राजमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार’ राजेंच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

हेही वाचा – ऊसबिलासाठी आश्वासने देऊन शेतकऱ्यांचा अंत पाहणाऱ्या मकाई अन बागलांच्या गलथान कारभाराविरोधात पुणे साखर आयुक्त कार्यालय येथे होणार बेमुदत हलगी नाद आंदोलन; वाचा सविस्तर

व्याख्याते जगदीश ओहोळ यांना छ.संभाजीनगर (औरंगाबाद) येथे समाजभूषण पुरस्कार प्रदान; वाचा सविस्तर

याप्रसंगी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, पद्मश्री डॉ पोपटराव पवार, शिवसेना संपर्क प्रमुख संजय कोकाटे, माजी आमदार नारायण पाटील,  राजकुमार मस्कर अध्यक्ष अ. भा. मराठा महासंघ इंदापूर, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, सविताराजे भोसले, तात्यासाहेब गोडगे माजी सरपंच रोपळे, अतुल दास शिवस्मारक समिती रोपळे व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line