तब्बल चाळीस वर्षा नंतर केत्तूर नं २ येथे येणाऱ्या एसटी बस पाटीचे नामकरण

तब्बल चाळीस वर्षा नंतर केत्तूर नं २ येथे येणाऱ्या एसटी बस पाटीचे नामकरण

केत्तूर प्रतिनिधी 
करमाळा एसटी बस आगार येथून केत्तूर नं २ येते येणारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस पारेवाडी या नावाने गेली चाळीस वर्षे येत होती. परंतु जनसेवा हीच ईश्वरसेवा सोशल फाऊंडेशन केत्तूर या फाऊंडेशन च्या कार्यकर्तेंनी परिवहन महामंडळाच्या सोलापूर आणि करमाळा येथील कार्यालयात पाठपुरावा करून पारेवाडी ऐवजी केत्तूर नं २ असे पाटीची नामकरण केले.

हेही वाचा – निधन वार्ता : केत्तूर येथील ज्येष्ठ नागरिक आण्णा मोरे यांचे निधन

केम येथील श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज मध्ये “आजची स्त्री-अबला नव्हे ,सबला” हा काव्य जागर कार्यक्रम संपन्न

गेली चाळीस वर्षे चाळीस वर्षे केत्तूर नं २ येथे येणारी बस पारेवाडी या नावाने येत होती.केत्तूर येथे येणारी बस पारेवाडी या नावाने येत असल्याने नवीन प्रवाश्यांची गैरसोय होत होती. जनसेवा हिच ईश्वरसेवा सोशल फाऊंडेशन केत्तूर यांच्या या कार्याबद्दल जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.

फोटो ओळी – नामकरणाची पाटी बनवल्यानंतर वाहक व चालक यांचा सत्कार करताना केत्तूर ग्रामस्थ 

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line