चैतन्य महेश कुलकर्णी चा डिजीटल मार्केटिंग एक्सलन्स आवार्डने पुणे येथे सन्मान

चैतन्य महेश कुलकर्णी चा डिजीटल मार्केटिंग एक्सलन्स आवार्डने पुणे येथे सन्मान

केत्तूर (अभय माने) वास्तू विश्व संशोधन केंद्र, पुणे आयोजित पदवीदान समारंभात चैतन्य कुलकर्णी मांजरगाव (ता.करमाळा) येथील एवढया लहान वयात डिजिटल मार्केटिंगमध्ये उत्तुंग यश मिळवल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. चैतन्य यांनी संस्थेच्या वाढीसाठी आणि प्रगतीसाठी दिलेले योगदान अत्यंत मोलाचे ठरले आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल, ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्राचे संस्थापक अध्यक्ष वेदमूर्ती श्री उमेश कुलकर्णी गुरुजी यांच्या हस्ते Digital Marketing Excellence Award देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

तो पुण्यामध्ये सध्या बी.सी.ए चे शिक्षण घेत आहे तसेच तो ऑनलाईन मार्केटिंगचे क्लास घेत असुन पुण्यातुन स्वतः ची मेटा टेक मॅनेजर ही ॲड एजन्सी चालवत आहे अनेक कंपन्यांच्या मेटा ॲड कँपीयन चालवत आहे. तसेच डिजीटल क्षेत्रात विविध प्रोजेक्ट वर तो काम करत आहे. अतिशय कमी वयात या क्षेत्रात तो कार्यरत आहे.

 

हेही वाचा – कोणत्याही पिकास ठिबक सिंचन आवश्यक- विजय बालगुडे

कामे न करता फक्त पैसा व मनोरंजनाच्या जोरावर आमदार होता येते हा विरोधकांचा गैरसमज – आ. बबनदादा शिंदे वडाचीवाडी (अं.उ) येथे शेतकरी मेळावा व वचनपूर्ती सोहळा संपन्न

संस्थेच्या डिजिटल प्रगतीत चैतन्य यांनी केलेले कार्य आदर्श आहे आणि त्यांचे यश त्यांच्या मेहनतीचे फलित आहे. असे प्रतिपादन उमेश कुलकर्णी गुरूजी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

karmalamadhanews24: