छडी लागे छम छम… शाळा मधून गायब

*छडी लागे छम छम… शाळा मधून गायब*

केत्तूर ( अभय माने) सध्याच्या आधुनिक काळात शैक्षणिक क्षेत्रात मोठे बदल होत आहेत सध्याच्या शैक्षणिक वातावरणात विद्यार्थी व पालकांसमोर शिक्षक वर्ग मात्र हतबल होत असल्याचे चित्र समोर येत आहे.

विद्यार्थ्यांना ओरडून बोलणे, डोळे वटारणे,हात उगारणे किंवा एखादा धपाटा मारणे असले प्रकार असे प्रकार केल्यास विद्यार्थी पालकांना घरी जाऊन शिक्षका विषयी तक्रार करीत आहेतः.पालकही विद्यार्थ्यांचे काय चुकले आहे हे न पाहता शिक्षकांना दम भरीत असल्याचे पूर्वीच्या काळी छडी लागे छम छम… हे गाणे आता कालबाह्य झाले असल्याचे निदर्शनास येत आहे.

काही वर्षांपूर्वी शिक्षकांना शाळेसह गावांमध्येही मानसन्मान प्रेम होता गावातील मंडळी शिक्षकांचे ऐकत असत गुरुजी रस्त्यावरून चालले तरी विद्यार्थी रस्ता बदलत पण समोरासमोर येणे टाळक असत.विद्यार्थ्याची काही चुकले असेल तर ” छडी लागे छम छम, विद्या येई घमघम ” या वातावरणात शिक्षण दिले जात असे मात्र सध्याचे आधुनिक काळामध्ये शिक्षकांची ही छडी मात्र गायब झाली आहे किंवा ती हिरावली गेली आहे.विद्यार्थी ही आपल्या परिस्थितीचे जाण बाळगून शिक्षण पूर्ण करून यश संपादन करीत असे परंतु सध्याच्या मोबाईलमुळे मुले चीडखोर झाली आहेत आपल्या मर्जीनुसार सगळे झाले पाहिजे असे असा त्यांचा आग्रह झाला होत आहे.त्यामुळे चुकले तरी शिक्षा झाली नाही पाहिजे कारण सगळ्यां वर्गासमोर आपला अपमान होतो असा त्यांचा समज होत आहे.

हेही वाचा – खाजगी मोबाईल कंपन्यांच्या दरात भरमसाठ वाढ : ग्राहक बीएसएनएल कडे पुन्हा वळू लागले !

वाढदिवस विशेष लेख “करमाळा ते कोलंबिया – वादळात ही पाय रोवून उभा राहणारा माणूस जगदीश ओहोळ”

पालक वर्ग ही शिक्षकांचे काहीही ऐकून न घेता आपल्या पाल्याची ऐकून घेत आहे असे विदारक चित्र समोर येत आहे.विद्यार्थी चुकल्यानंतरही पालक थेट शाळेत दाखल होत आहेत व शिक्षकांना जाब विचारत आहेत त्यामुळे शिक्षक वर्गही केवळ पाटया टाकण्याचेच काम करीत असल्याने गुणवत्ता मात्र वरचेवर कमी होताना दिसत आहे.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line