देश/विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रीय घडामोडी

केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालेले महाराष्ट्रातील चार पैकी ‘हे’ तीन नेते तर काँग्रेस व राष्ट्रवादीतून भाजपात आलेले आयाराम आहेत!

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालेले महाराष्ट्रातील चार पैकी ‘हे’ तीन नेते तर काँग्रेस व राष्ट्रवादीतून भाजपात आलेले आयाराम आहेत!

आज भाजप सरकारने आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल केले आहेत. जुन्या व निष्ठावान भाजप नेत्यांना राजीनामा द्यावा लागला आहे तर नव्या भिडूना भाजपने केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले आहे.

त्यात आज महाराष्ट्रातील नारायण राणे, कपिल पाटील, डॉ भारती पवार, डॉ भागवत कराड, या चार जणांना केंद्रीय मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे या चार पैकी 3 जण हे काँग्रेस व राष्ट्रवादीतुन भाजपात आलेले आयाराम आहेत हे विशेष!

नारायण राणे हे शिवसेना, कॉंग्रेस आणि भाजप असा प्रवास करून आलेले आहेत. नारायण राणे यांनी कॉंग्रेसमधून 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी 2005 मध्ये शिवसेनेला राम राम करत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

◆नारायण राणे यांच्याकडे सूक्ष्म,लघु, मध्यम उद्योग मंत्रालय,आधी हे खाते नितीन गडकरी यांच्याकडे होते

◆बहुचर्चित सहकार मंत्रालय अमित शहा यांच्याकडे!

◆रावसाहेब दानवे – रेल्वे राज्यमंत्री

◆डॉ भागवत कराड – अर्थ राज्यमंत्री

◆डॉ भारती पवार – आरोग्य, कुटुंब कल्याण राज्यमंत्री

◆कपिल पाटील -पंचायत राज राज्यमंत्री

दिंडोरी मतदारसंघातून खासदार असणाऱ्या डॉ.भारती पवार यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादीतुन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या पेशाने डॉक्टर आहेत.

खा.कपील पाटील यांची दुसरी टर्म आहे. कपील पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून 2014 ला भाजपमध्ये प्रवेश केला होता. ते भिवंडी लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात.

भागवत कराड हे गोपिनाथ मुंडे यांचे विश्वासू मानले जातात. वंजारी समाजातून येणारे भागवत कराड हे एकमेव भाजपचे नेते आहेत. ज्यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा- आणि आत्महत्या करायला निघालेल्या आजीबाई फिरल्या माघारी ; केतूर येथील तरुणांनी टाळला अनर्थ

व्यापारी संकुलाला जयवंतराव जगताप यांचे नाव असल्याने विरोधकांनी त्या कामाच्या दर्जाची चिंता करू नये; आज आरडाओरडा करणारे तेव्हा हॉंगकॉंगला गेलेले का.?

एकंदरीत वरील 4 मंत्र्यांपैकी 3 मंत्री कॉंग्रेस राष्ट्रवादीतून आलेले आहेत, हे विशेष!

litsbros

Comment here