आम्ही आधीपासूनच गळ्यात जानवं ही घालतो, आमचं आरक्षण रद्द करून आम्हाला ब्राह्मण जातीत स्थान द्या; सुतार समाजाची मागणी
पुणे(प्रतिनिधी) ; एकीकडे महाराष्ट्र व देशात अनेक समाज आरक्षणासाठी भांडत असताना महाराष्ट्रातील सुतार समाजाने घेतलेल्या भूमिकेने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
आमची आता प्रगती झाली आहे, आमचे विचार प्रगत झाले आहेत त्यामुळे आता आम्हाला आरक्षण नको. आमचे आरक्षण काढून घ्या व आमचा ब्राह्मण जातीत समावेश करा अशी मागणी विश्वकर्मा प्रतिष्ठान चे संस्थापक विष्णू गरुड व संजय भालेराव यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
हेही वाचा- करमाळ्यात आपत्ती व्यवस्थापनाचे वाजले बारा; बहुजन क्रांती मोर्चाचा आंदोलनाचा इशारा
आनंदवार्ता- अखेर सिना कोळेगाव धरण शंभर टक्के भरले; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
सुतार समाज व ब्राम्हण समाज यांच्यात खूप साम्य आहे. आम्ही हिंदू धर्माच्या सर्व चालीरीती व परंपरा पाळतो. तसेच ब्राम्हण समाजाप्रमाणे गळ्यात जानवे ही घालतो, त्यामुळे आता नव्याने आमची जनगणना करून त्यात आमचा ब्राम्हण म्हणून समावेश करावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या या निवेदनात करण्यात आली आहे.
तसेच आता लवकरच याबाबत आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. गेल्या सत्तर वर्ष आरक्षण घेऊन सुतार समाज आता सर्व क्षेत्रात प्रगत झाला आहे असे त्यांनी शेवटी सांगितले.
Comment here