सालसे येथे बौद्ध धम्म जागृती सोहळा व धम्म रॅली संपन्न
करमाळा प्रतिनिधी – मार्गशीर्ष पौर्णिमा निमित्त दि.१५/१२/२०२४ रोजी सालसे ता. करमाळा येथे बौद्ध धम्म सोहळा व धम्म रॅली काढण्यात आली.धम्म रॅली ला मोठा प्रतिसाद मिळाला.त्यानंतर पूज्य भंतेजी महामोगलायन व चला बुद्धाच्या घरी अभियानाचे प्रमुख प्रबुद्ध साठे सर यांच्या हस्ते प्रथम तथागत गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्रिशरण पंचशील घेण्यात आले.
भंते महामोगलायन यांनी सुंदर अशी धम्मदेशना दिली.त्यांनी मानवाच्या जीवनात संस्काराचे महत्व सांगितले.तरुणांनी व्यसनापासून अलिप्त राहण्याचा संदेश दिला. त्यानंतर प्रबुद्ध साठे सर यांनी मार्गशीष पौर्णिमेचे महत्व सांगितले व बौद्ध धम्माचे आचरण करण्यासाठी महिलांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे हे प्रबोधनातून सांगितले.अंद्धश्रद्धा,कर्मकांड मुक्त जीवन जगावे असे सांगितले. दिपक ओहोळ सर यांनी जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
पांडे येथे गणेश चिवटे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन
करमाळा, माढा,मोहोळ,पंढरपूर ,माळशिरस,इंदापूर,परांडा येथील धम्म जागृती संघाच्या शेकडो उपासक-उपासिका उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन सिद्धार्थ तरुण मंडळ,सालसे तसेच दिपक ओहोळ यांनी केले होते.यावेळी महाविहार परंडा चे अध्यक्ष राजेंद्रकुमार निकाळजे,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष ओहोळ,वंचित बहुजन युवा आघाडीचे अण्णा वाघमारे,अश्विनीताई हावळे,राजेश पवार,नंदू कांबळे, सावताहरी कांबळे,बाळासाहेब गायकवाड इ.उपस्थित होते.मोहोळ येथील आवारे परिवार यांनी भंते महामोगलाय यांना अष्टशील पुरस्कार देऊन सन्मानित केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्धाचार्य आयु.मिलिंद मिसाळ यांनी केले.स्नेहभोजनने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.