करमाळाक्राइम

मा.ना चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर शाई फेक केलेल्या व्यक्तीला कठोर शिक्षा व्हावी; भाजपा करमाळा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांची मागणी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

मा.ना चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर शाई फेक केलेल्या व्यक्तीला कठोर शिक्षा व्हावी; भाजपा करमाळा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांची मागणी

करमाळा (प्रतिनिधी)- मा.ना चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर शाई फेकलेल्या व्यक्तीच्या निषेधाबाबत भारतीय जनता पार्टी करमाळा तालुक्याच्या वतीने पोलिस निरीक्षक साहेब यांना निवेदन देण्यात आले, या निवेदनात पुणे येथे मा.ना चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर शाई फेकलेल्या व्यक्तीला कठोर शिक्षा व्हावी, त्या व्यक्तीने केलेलं कृत्य हे अनैतिक असून भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही त्या व्यक्तीचा जाहीर निषेध करतो असे नमूद केले आहे.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गणेश चिवटे, जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, तालुका चिटणीस आदिनाथ सुरवसे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस अमोल पवार, विश्व हिंदू परिषदेचे संतोष वाळुंजकर,

युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सचिन गायकवाड, ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष धर्मराज नाळे, डॉ अभिजीत मुरूमकर, माजी शहराध्यक्ष भैय्या कुंभार, देविदास बरडे ,प्रसाद गेंड, संजय किरवे, जयंत काळे पाटील, भैया गोसावी, शरद कोकीळ, विनोद इंदलकर, बाळा जाधव ,भरत चोपडे ,दीपक सवालके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

litsbros

Comment here