आरोग्यसोलापूर जिल्हा

चिकन खाताय.? हे वाचाच.. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर चिकन दुकानदारांना सोलापूर आयुक्तांनी दिल्या ‘या’ सूचना

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

चिकन खाताय.? हे वाचाच.. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर चिकन दुकानदारांना सोलापूर आयुक्तांनी दिल्या ‘या’ सूचना

सोलापूर: सध्या बर्ड फ्लूच्या आजाराच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांच्या निर्देशाने सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील व शहरातील सर्व चिकन सेंटर wholesalers and Retailers यांना सूचना देण्यात येत आहेत की सर्वांनी healthy बर्ड्स आणि अंडी विकावे. विकताना ग्लोजचा वापर करावा मृत पक्षाची चिकन विकू नये कुठल्याही पक्षी मृत्यू आढळल्यास त्याचे मृताची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने PPE किट घालून N-95 मास्कचा वापर करून व हातात ग्लोजचा वापर करावा. तसेच तीन फुटांपेक्षा जास्त खोलीचा खड्ड्यांमध्ये असे पक्षी चुना घालून पुरावेत. सोलापूर महापालिका क्षेत्रातील परिस्थिती नियंत्रण करण्यासाठी मृत पक्षाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठवावेत.

सदर् आजाराच्य नियंत्रणासाठी नियत्रंक अधिकारी प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ.नितीन गोटे मोबाईल नंबर 84 59 12 52 11 आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सोमनाथ चराटे मोबाईल नंबर 95 61 12 93 93 यांची नेमणूक करण्यात आली आहे .नागरिकांना कोणतीही तक्रार असल्यास महापालिका कंट्रोल रूमला संपर्क 02172740341 करावा तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये सध्या सोलापुरात एकही रुग्ण नाही. अशी माहिती उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली. चिकन व अंडी उकळून व पूर्णपणे शिजवून खावे यामुळे बर्ड फ्लूचा संसर्ग होत नाही. या विषाणूंचा प्रसार कुक्कुट पक्ष्यांचे मांस,अंडी किंवा मासे यांच्या मार्फत होत नाही. 

litsbros

Comment here