पंढरपूर

मोठी बातमी : उपवासाचे पदार्थ खाल्ल्याने 107 भाविकांना विषबाधा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

मोठी बातमी : उपवासाचे पदार्थ खाल्ल्याने 107 भाविकांना विषबाधा

पंढरपूरमध्ये माघी यात्रेसाठी आलेल्या भाविकांनी भगर आणि आमटी खाल्ल्यानंतर त्यांना अचानक मळमळ आणि उलटीचा त्रास होऊ लागला. गुरुवारी पहाटे 137 भाविकांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

माघी यात्रा सोहळा साजरी करण्यासाठी 31 जानेवारी रोजी दरवर्षीप्रमाणे दिंडी पंढरपुरात पोहोचली. यानंतर पंढरपुरातील संत निळोबा सेवा मंडळ या मठामध्ये भाविकांनी मुक्काम केला होता.


उपवासाच्या दिवशी बुधवारी रात्री सर्वांनी भगर आणि आमटी खाल्ली होती. परंतु आज गुरुवारी पहाटेच्या सुमारास सर्वांना मळमळ उलट्या असा त्रास होऊ लागला त्यानंतर रुग्णवाहिका बोलवण्यात आली. बाधित सर्व 107 भाविकांना पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. योग्य उपचार वेळेत मिळाल्यामुळे सध्या या सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते आहे.

litsbros

Comment here