महाराष्ट्रराज्य

शेतात पिकाला पाणी द्यायला गेलेल्या तरुणाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

शेतात पिकाला पाणी द्यायला गेलेल्या तरुणाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू

बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची ही घटना सायंकाळी उघड़कीस आली. सदर घटना ही बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सुर्डी या ठिकाणी घडली आहे. नागनाथ गहिनिनाथ गर्जे वय ४० वर्षे असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. या हल्ल्यामुळे आष्टी तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. नागनाथ गहिनीनाथ गर्जे हे आपल्या शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते.

सुर्डी येथील शेतकरी नागनाथ गहिनिनाथ गर्जे हे गावाजवळच्या वाघदरा या शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. पाणी देत असताना बिबट्याने अचानकपणे नागनाथ गहिनीनाथ गर्जे त्यांच्यावर हल्ला चढवला.

यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुपारपासून गेलेले नागनाथ गर्जॅ सायंकाळपर्यंत घरी परत न आल्याने नातेवाईकांनी शेतात जाऊन पाहणी केली असता, नागनाथ गर्जे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. दरम्यान त्यांचा बिबट्याच्या हल्ल्यात जागीच मृत्यू झाला होता.

हेही वाचा – अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या मदतीला धावले आमदार रोहित पवार ‘अशी’ केली मदत.. वाचा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ‘त्या’ फोटो मागील सत्य

भिलारवाडी येथील पाळीव जनावरांवर बिबट्यासदृश प्राण्याचा प्राणघातक हल्ला; गावात घबराट

चेहरा आणि मान बिबट्याने खाल्ली होती….

बिबट्याच्या हल्ला करून, नागनाथ गर्हे यांचा चेहरा आणि मान खाल्ली होती. त्याचबरोबर सर्व चेहरा छिन्न विच्छिन्न झाला होता. आष्टी तालुक्यात बिबाट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर होत असून वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना जीव गमवावा लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

वनविभागाने त्वरित बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत. मयत हे आष्टी पंचायत समितीच्या मोराळा गनाच्या पंचायत समिती सदस्या आशा गर्जे यांचे पती आहेत.

litsbros

Comment here