भीम आर्मीचे सर्वेसर्वा चंद्रशेखर आजाद यांच्यावर झालेल्या हल्लाचा निषेध; करमाळा तहसीलदारांना निवेदन
करमाळा(प्रतिनिधी); भीम आर्मीचे सर्वे सर्वा मा चंद्रशेखर आजाद साहेब यांच्यावर देवबंद येथे गोळीबार करण्यात आला गोळीबार इतका तीव्र होता की त्यांच्या गाडीमध्ये गोळ्या लागल्याचेही दिसून येते ती गोळी त्यांच्या पाठीला घासून गाडीमध्ये आरपार झाली ते थोडक्यात बचावले.
या झालेल्या भ्याड हल्ल्याचा मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवा आघाडीच्या वतीने एका निवेदनाद्वारे जाहीर निषेध करण्यात आला आहे. चंद्रशेखर आझाद साहेब यांनी वारंवार प्रशासनाकडे सुरक्षा देण्याची मागणी केलेले असताना देखील प्रशासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले यामुळेच हा हल्ला झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी प्रशासनाने त्वरित पावले उचलत ताबडतोब चंद्रशेखर आझाद यांना सुरक्षा प्रदान करावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवा आघाडीच्या वतीने देशभर ती स्वरूपाच्या आंदोलन छेडले जाईल असे निवेदनात नमूद करण्यात आले.
केत्तूर येथे चोरट्यांनी वृध्द महीलेस जबरी मारहाण करून सोने लुटले
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची युवा जिल्हाध्यक्ष यशपाल कांबळे.तालुका कार्याध्यक्ष नितीन दामोदरे. पप्पू ओहोळ. अमोल गायकवाड. सचिन गायकवाड.संतोष लांडगे. लंकाबाई लांडगे. अश्विनी लांडगे.सचिन लांडगे. नितीन लांडगे. चिराग लांडगे. अभिजीत समिंदर आदी जण उपस्थित होते.