माढासांस्कृतिकसोलापूर जिल्हा

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व हर घर तिरंगा मोहीम जागृतीसाठी माढा नगरपंचायतीच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व हर घर तिरंगा मोहीम जागृतीसाठी माढा नगरपंचायतीच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन

माढा प्रतिनिधी:भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पर्श्वभूमीवर, जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढयाच्या स्मृती तवत राहव्यात, स्वतंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक / क्रांतीकारक / स्वांतत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना याचे स्मरण व्हावे तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायम स्वरुपी जनमानसात रहावी, या उद्देशाने दैदिप्यमान इतिहासाचे अभिमान पूर्व:क संस्मरण करण्यासाठी दिनांक 13 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीसाठी केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे “हर घर तिरंगा” हा उपक्रम नगपंचायत माढा येथे राबविण्यात येत आहे.

त्यानिमित्ताने माढा नगरपंचायतचे मुख्याधिकारी मा. चरण कोल्हे सर, प्रशासकीय अधिकारी श्रीमती पुजा खडतरे तसेच माढा शहरातील सहकार महर्षी गणपतराव साठे शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांच्या सहकार्याने संपूर्ण शहरातून रॅलीचे नियोजन केले.

विध्यार्थ्यानी नेत्याची साकारलेली वेशभूषा या कार्यक्रमाचे लौकिक ठरले.यावेळी माढा शहरातील नागरिकांना “हर घर तिरंगा” या उपक्रमाबद्दल माढा नगरपंचायत नगराध्यक्षा मिनलताई साठे यांनी संबोधित केले.

हेही वाचा – माढा तहसील समोर स्वातंत्र्यदिनी होणार हलगीनाद आंदोलन

खोटे लग्न लावून तरुणास फसवले, पावणेदोन लाखांचा गंडा; सोलापूरच्या माय-लेकीला अटक

माढा नगरपंचायतींच्या उपनगराध्यक्षा मा. कल्पनाताई जगदाळे, पाणी पुरवठा सभापती मा. नितिन नाना साठे, बांधकाम सभापती मा. अरुण कदम तसेच सर्व नगरसेवक, नगरसेविका, नगरपंचायत अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

litsbros

Comment here