भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या प्रयत्नामुळे करमाळा तालुक्यातील १६ पाणंद रस्त्यांची कामे सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली

भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या प्रयत्नामुळे करमाळा तालुक्यातील १६ पाणंद रस्त्यांची कामे सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली

करमाळा – भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांची गेल्या काही दिवसापूर्वी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदी निवड झाली व चिवटे यांनी पहिल्याच नियोजन समितीच्या बैठकीमध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते बंद असले बाबत आवाज उठवला होता,
यानंतर तहसीलदार समीर माने यांच्या अध्यक्षतेखाली करमाळा पंचायत समितीच्या सभागृहात या विषयावर बैठक संपन्न झाली.

हेही वाचा – पारेवाडी रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळविणेसाठी बैठक संपन्न; मार्चमध्ये “एल्गार मोर्चा” द्वारे देणार निवेदन

जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी करमाळा तालुक्यातील खडकी येथील दोघांवर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल

 लवकरच या रस्त्यांची कामे सुरू होतील असे तहसीलदार माने यांनी सांगितले आहे, या बैठकीसाठी तहसीलदार समीर माने ,जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता डी.पी गौडरे ,सार्वजनिक बांधकाम विभागाचे के. एम. उबाळे ,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्यासह संबंधित प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

karmalamadhanews24: